Join us

सिक्सपॅक अ‍ॅब्जमुळे उद्धवस्त झालं अभिनेत्याचं करिअर; गमवावे लागले 107 सिनेमे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 11:37 AM

Hemant birje: धर्मेंद्र, गोविंदा यांसारख्या बड्या कलाकारांनीही त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता.

बॉलिवूडमध्ये (bollywood) असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला. परंतु, आता ते कलाविश्वातून अचानकपणे गायब झाले आहेत. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे हेमंत बिरजे (hemant birje). १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या अॅडव्हेंचर ऑफ टार्झन या सिनेमामुळे हेमंत रातोरात प्रकाशझोतात आले. विशेष म्हणजे त्यांच्या अभिनयापेक्षा त्यांच्या फिटनेस सर्वाधिक चर्चा रंगली आहे.  परंतु, त्याचा हा फिटनेसच त्याच्या करिअरच्या आड आला.

 हेमंतचा पहिला सिनेमा गाजल्यानंतर त्याने जवळपास १०७ सिनेमा साईन केले होते. परंतु, त्याच्या फिटनेसमुळे त्याचे एक-एक सिनेमा त्याच्या हातून गेले. हेमंतने ज्यावेळी कलाविश्वात पदार्पण केलं. त्यावेळी अभिनेत्यांमध्ये सिक्सपॅक्स अॅब्सचा ट्रेंड नव्हता. तेव्हा केवळ सिनेमात गाणी, मारामारी यांची क्रेझ होती. त्यामुळे हेमंतचा या क्षेत्रात फारसा ठावठिकाणा लागला नाही.

या कारणामुळे हेमंतला मिळेनासं झालं काम

पडद्यावर हेमंतचा फिटनेस उत्तमरित्या दिसायचा. त्यामुळे अनेक कलाकार त्याच्यासोबत काम करायला नकार देत होते. त्याच्या फिटनेसपुढे आपण फिके पडू ही भीती कलाकारांमध्ये होती. याविषयी हेमंतने 'बॉलिवूड ठिकाना'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.

"कौन करे कुर्बानी या सिनेमामध्ये माझ्यासोबत धर्मेंद्र आणि गोविंदा हे दोन दिग्गज कलाकार झळकले होते. परंतु, मला पाहिल्यानंतर धर्मेंद्र यांनी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला. पहिल्या दिवशी मी या चित्रपटाच्या सेटवर पोहोचलो तेव्हा धर्मेंद्रजींनी मला पाहिलं. मला पाहताच ते दिग्दर्शक अर्जुन हिंगोराणीला म्हणाले, अर्जुन इकडे ये हा कोणता हिरो घेऊन आला आहेस? तो उंच आहे, त्याच्याकडे पर्सनॅलिटीही आहे तो दिसतोही छान. मी याच्यासोबत काम करणार नाही", असं धर्मेंद्र यांनी म्हटल्याचं हेमंतने सांगितलं.

पुढे तो म्हणतो, "धर्मेंद्र यांचं बोलणं ऐकल्यानंतर दिग्दर्शकांनी त्यांची समजूत काढली. बरं, मी तुला रेल्वे स्टेशनवरून आणून हिरो बनवलं आणि आता तू माझ्याशी असं वागणार? तू माझा चित्रपट नाकारणार का? त्यानंतर धर्मेंद्रनं हेमंतसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर सिनेमाचं शूटिंग करत असताना बऱ्याच सीनमध्ये गोविंदा यांनीही माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला होता."

दरम्यान, टारझन हिट झाल्यानंतर हेमंतला १०७ सिनेमाच्या ऑफर्स मिळाल्या. मात्र, नंतर अनेक सिनेमांमधून त्याला काढून टाकण्यात आलं होतं. त्याच्या फिटनेसमुळेच अनेक कलाकारांनी त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याचं बॉडीबिल्डिंगचं त्याच्या करिअरमध्ये अडसर ठरलं.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमागोविंदाधमेंद्र