Join us

तसनीम शेख सांगतेय तिचा फिटनेस मंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 4:37 PM

अभिनेत्री तसनीम शेख कलर्सच्या महान कलाकृती असलेल्या दास्तान-ए-मोहब्बत सलीम अनारकली या शोमध्ये रूकैय्या बेगमची मुख्य भूमिका साकारत आहे.

अभिनेत्री तसनीम शेख कलर्सच्या महान कलाकृती असलेल्या दास्तान-ए-मोहब्बत सलीम अनारकली या शोमध्ये रूकैय्या बेगमची मुख्य भूमिका साकारत आहे. मुघल सम्राज्ञी असल्याप्रमाणे ती आकर्षक पेहराव सुंदर दागिन्यांसह घालताना दिसत आहे त्यामुळे ती अतिशय सुंदर व आकर्षक दिसत आहे. वडील आणि मुलगा यांच्या मध्ये अंतर आणणाऱ्या दुष्ट राणीची भूमिका ती साकारत आहे.

तसनीम शेख तिच्या वास्तविक जीवनात तिच्या आरोग्याविषयी अतिशय जागरूक आहे आणि तिचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ती अतिशय कडक नियम पाळते. योगा पासून ते कार्डिओ पर्यंत सर्वकाही तसनीम करते आणि वर्कआऊट मधील रस कायम रहावा यासाठी ती वेगवेगळे वर्कआऊट करते. ती अतिशय काटेकोर वेळापत्रक पालते आणि वेळेवर झोपते त्यामुळे तिच्या मते तिचे आरोग्य चांगले राहण्याचा आरोग्यदायी जीवनशैलीचा हा तिचा फिटनेस मंत्र आहे. जरी तिला 12 तासांची शिफ्ट असली तरी ती ती तिचा वर्कआऊट संपविण्यात यशस्वी होते आणि स्वतःला उल्हसित ठेवते.

तिच्या फिटनेस रेजिमे विषयी विचारले असता तसनीम शेखने सांगीतले, “आम्हाला अभिनेते म्हणून तंदुरूस्त राहणे आणि चांगले दिसणे महत्वाचे असते. मला वर्कआऊट करायला आवडते, त्यामुळे मला दिवसभर ऊर्जा मिळायला मदत मिळते. माझ्यासाठी फिटनेस हा माझ्या रोजच्या जीवनाचा एक भाग आहे. पण फिटनेस म्हणजे पिळदार स्नायुनाही, त्याचा अर्थ आहे कार्यक्षम, चपळ आणि लवचिक असणे हा आहे. माझा फिटनेस मंत्र आरोग्यदायी जीवनशैली असणे आणि सकारात्मक विचार करणे हा आहे. मी तंदुरूस्त व निरोगी राहण्यासाठीच फक्त आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करते असे नाही तर माझे मन सुध्दा निरोगी आहे. मी नकारात्मक विचार आणि उर्जेपासून स्वतःला बाजूला ठेवते. मी दररोज ध्यान करते. शेवटी, मी काम वेळेवर संपविण्याचा प्रयत्न करते त्यामुळे मला माझ्या कुटुंबाकडे वेळेवर परत जाता येते आणि त्यांच्या सोबत वेळ घालविता येतो.”

सध्या रुकैय्या हे शो मधील एक खूप महत्वाचे पात्र आहे. मलिका-ए-हिंदुस्तान बनण्याची महत्वाकांक्षा असणारी राणी आहे. ती सम्राट अकबराची पहिली बायको आहे आणि तिला राज्य करण्याची इच्छा आहे. सलीम आणि अनारकली एकमेकांच्या प्रेमात पडलेले असताना सुध्दा त्या दोघां मध्ये ती मुद्दाम अडचणी निर्माण करते. मुघल साम्राज्य ताब्यात घेण्यात ती यशस्वी होईल का? सलीमला त्याच्या सावत्र आईचा दुष्ट हेतू कळेल का?

टॅग्स :दास्तान-ए-मोहब्बत