Join us  

TE3N...अमिताभ व नवाजुद्दीनचा अभिऩय सोडला, तर तिनपाट सिनेमा

By admin | Published: June 08, 2016 6:52 PM

विद्या बालनच्या अभिनयाच्या दृष्टीने चांगला असेल अशी अपेक्षा होती, पण विद्या बालनला घेतलं नसतं तरी चाललं असतं इतका दुय्यम रोल तिचा आहे

रेटींग - 5 पैकी 2.5 स्टार 
 
बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा काम करण्याचा उत्साह हा तरुण पिढीलाही लाजवेल असा आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटात बिग बी काहीना काही नवे करताना दिसतात. ‘पिकू’ चित्रपटात त्यांनी सायकल चालवली होती. गेल्यावर्षी कुर्ता आणि डोक्यावर टोपी, मोठे पोट अशा लूकमध्ये अमिताभ कोलकाताच्या रस्त्यावरून सायकल चालविताना दिसले होते. असेच काहीसे दृश्य पुन्हा एकदा प्रेक्षकांना TE3Nया चित्रपटात दिसेल. या चित्रपटात ते स्कूटर चालविताना दिसतील.
 
'TE3N' चित्रपटाची कथा आजोबा आणि नात यांच्या भोवताली फिरते आहे. ‘तीन’ हा एका कोरियन सिनेमाचा रिमेक आहे. जॉन बिस्वास हा मध्यवर्गीय अँग्लो-बंगाली गृहस्थ आणि त्याची नात यांची ही कथा. जॉनची नात अपघाताने हरवते. कदाचित तिचे अपहरण होते. ‘तीन’ ही सूडकथा नव्हे तर शोधकथा आहे. जॉन बिस्वास हा शारिरीकदृष्ट्या अशक्त पण तेवढाच दृढनिश्चियी असतो. नातीचा शोध घेण्यासाठी तो घराबाहेर पडतो. या चित्रपटात विद्या बालनही आहे. पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेतील विद्या आणि माजी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील नवाजुद्दीन सिद्दीकी हेही जॉनला हरवलेल्या नातीचा शोध घेण्यासाठी कशापद्धतीने मदत करतात हे पडद्यावरच पहा.
 
‘तीन’ हा एक इमोशनल थ्रीलर चित्रपट आहे. सस्पेन्स असला तरी चित्रपट थोडा मध्येच संथ होत असल्याने आपला रसभंग होऊ शकतो, मध्यांतरापुर्वी चित्रपटाची लांबी जास्त असल्यामुळे कंटाळवाणा वाटतो. रिभू दासगुप्ता यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
 
कलाकारांचा अभिनय -
TE3N हा अमिताभ, नवाजुद्दीन व खास करून विद्या बालनच्या अभिनयाच्या दृष्टीने चांगला असेल अशी अपेक्षा होती, अमिताभ आणि नवाजुद्दीन यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या भुमिकेला योग्य तो न्याय दिला आहे. त्यांचा अभिनय चित्रपटाला वेगळ्याचं उंचीवर नेतो. पण चित्रपटात विद्या बालनने पुर्णपणे निराशा केल आहे, इतकं, की तिला चित्रपटात का घेतलयं हाच प्रश्न आपल्याला पडतो. दर्जेदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या विद्याने हा रोल का निवडला?
 चित्रपटाचे संगीतही फारसे प्रभावी नाही, एकही गाणे श्रवणीय नाही.
 
वैशिष्ट्ये : अमिताभ बच्चन चित्रपटाचा ढासळणारा तोल सावरण्याचा खूप प्रयत्न करतात. हेच या चित्रपटाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे. नवाजुद्दीनने ही अमिताभना पुरेपूर साथ दिली आहे. या दोघांच्या अभिनयाशिवाय बंगालमधील लोकेशनही चांगले आहे.
 
का पाहावा?
अमिताभ बच्चन आणि नवाजुद्दीन यांच्या दमदार अभिनयासाठी आणि बंगालच्या लोकेशन साठी
का पाहू नये?
ढिसाळ लेखन, कमकुवत कथानक, चित्रपटाची संथ गती 
 
काय आहे हा सिनेमा, कशासाठी बघावा आणि का बघू नये हे सांगितलंय या व्हिडीयो रिव्ह्यूमध्ये सीएनएक्सच्या जान्हवी सामंत आणि लोकमतच्या मिनाक्षी कुलकर्णी यांनी...