छोट्या पडद्यावरच नाही तर रुपेरी पडद्यावरही तेजश्रीने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. विविध सिनेमातील भूमिका रसिकांना भावल्या आहेत. छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यानंतर हिंदी तसंच मराठी रंगभूमीवरही तेजश्रीने छाप पाडली आहे. हिंदी असो किंवा मराठी नाट्य रसिक तेजश्रीच्या अभिनयावर फिदा आहेत. विविध नाटकात तेजश्रीने दमदार भूमिका साकारल्या आहेत. तेजश्री सोशल मीडियावरही बरीच ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. आपले विचार तसंच स्वतःचे फोटो ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. गेल्या काही दिवसांत तेजश्रीने आपल्या विविध फोटोंनी फॅन्सवर जादू केली आहे.
विविध स्टाईलमधील तेजश्रीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचे विषय ठरत आहेत. मॉर्डन आणि पारंपरिक ड्रेसिंग स्टाईलची झलक या फोटोमध्ये पाहायला मिळते. काही फोटोमध्ये तेजश्रीचा निरागसपणा दिसून येत आहे. तर काही फोटोंमध्ये तेजश्रीच्या घायाळ करणाऱ्या अदाही पाहायला मिळतात. मात्र आकर्षक स्टाईल आणि फॅशनची असलेली जाण यामुळे प्रत्येक फोटोत तेजश्रीचं सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसत आहे.
तेजश्रीच्या या प्रत्येक फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. तेजश्रीने छोट्या पडद्यावरील विविध मालिकांसह रुपेरी पडद्यावरील झेंडा, शर्यत, डॉ. प्रकाश बाबा आमटे, ती सध्या काय करते, ओली की सुकी अशा सिनेमात काम केले आहे. शरमन जोशीच्या मैं और तुम या नाटकातही तिने भूमिका साकारली आहे. शिवाय प्रशांत दामले यांच्यासह कार्टी काळजात घुसली या नाटकातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले.
तसेच तिच्या सोशल मीडिया पेजवर बिनधास्तपणे स्वतःचे नो मेकअप लूकमधील सेल्फीज पोस्ट कलेले पाहायला मिळतात. या फोटोंमुळे प्रत्यक्षात तेजश्री विना मेकअप राहणे पसंत करते असे तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन समजते. त्यामुळे मेकअप असो किंवा तेजुचा अंदाज हा चिअरफुल लूक सा-यांची वाहवा मिळवताना पाहायला मिळत आहे.