Join us

ही चिमुरडी आहे छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध सुनबाई, ओळखा पाहू कोण आहे ही?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 6:12 PM

या अभिनेत्रीला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिला सोशल मीडियावर देखील तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात.

ठळक मुद्देछोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा दोन्ही ठिकाणी तिने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. आम्ही बोलतोय, तेजश्री प्रधानबाबत...

लाल रंगाच्या चनिया चोलीमधील ही गोंडस मुलगी कोण आहे हे तुम्ही ओळखले का? ही चिमुकली आता छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने नाटकांमध्ये, चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिच्या अभिनयावर, सौंदर्यावर तिचे चाहते फिदा आहेत. तिला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिला सोशल मीडियावर देखील तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. याच अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वी तिचा हा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा दोन्ही ठिकाणी तिने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. आम्ही बोलतोय, तेजश्री प्रधानबाबत... विविध सिनेमातील तिच्या भूमिका रसिकांना भावल्या आहेत. छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यानंतर हिंदी तसंच मराठी रंगभूमीवरही तेजश्रीने छाप पाडली आहे. हिंदी असो किंवा मराठी नाट्य रसिक तेजश्रीच्या अभिनयावर फिदा आहेत. झी मराठीवरील होणार सून मी या घरची या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान ही महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. इतकंच नव्हे तर ती महाराष्ट्राची लाडकी आणि आदर्श सून बनली. या मालिकेआधी तिने झेंडा या चित्रपटात काम केले होते. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता या मालिकेने मिळवून दिली.

तेजश्रीने होणार सून मी या घरची या मालिकेनंतर चित्रपटात आणि नाटकात काम केलं. त्यामुळे छोट्या पडद्याला काही काळासाठी तिने रामराम ठोकला होता. पण आता ती प्रेक्षकांना 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. तेजश्रीची ही भूमिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या मालिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. तेजश्री सोबतच या मालिकेत निवेदिता सराफ, रवी पटवर्धन आणि गिरीश ओक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

तेजश्रीच्या ती सध्या काय करते या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. एवढेच नव्हे तर कार्टी काळजात घुसली आणि तिला काही सांगायचंय या तिच्या नाटकांना देखील प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले आहे. तिने सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील केले होते. 

टॅग्स :तेजश्री प्रधान