मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी आज आघाडीची अभिनेत्रीच्या यादीत गणली जाते. मात्र तिचा हा अभिनेत्री बनण्यापर्यंतचा प्रवासही तिच्यासाठी सोपा नव्हता. तिलाही करिअरच्या सुरुवातीला प्रचंड स्ट्रगल सहन करावा लागला.
प्रत्येकालाच आयुष्यात स्ट्रगल हे करावं लागतं.. स्ट्रगल काळ कुणालाच चुकला नाही...मग तो तेजस्विनीला तरी कसा कसा चुकणार....अमाप लोकप्रियता मिळवल्यानंतरही स्ट्रगल पिरीयडच्या आठवणी तेजस्विनीच्या मनात आजही ताज्याच आहेत....याबाबतचा एक किस्सा तिने शेअर केला आहे.
इतरांप्रमाणेही तिच्या आयुष्यात असा एक क्षण आला ज्याचा विचार कुणीही करुच शकत नाही. मात्र त्यावेळीसुद्धा हार न मानता आपला स्ट्रगल सुरूच ठेवला. एकवेळ अशीही होती की घरात जेवायलाही पैसे नव्हते. त्यामुळे मैद्याची बिस्किटं खाऊन तिने दिवस काढले. इतकेच नाही तर हातात पैसे नसल्याने वीज बिलही भरता यायचे नाही.
म्हणून जोपर्यत बिल भरण्या इतपत पैसे नाही तोपर्यंत अंधारातच दिवस काढले. करिअरच्या या यशाचा आनंद अनुभवत असताना स्ट्रगलमुळेच तेजस्विनी एक अभिनेत्री म्हणून रसिकांच्या भेटीला आली त्यामुळे त्या अनेक आठवणी तिच्या मनात आजही घर करून आहेत.