Join us

१२ वर्षांपुर्वी त्या मुलीला माझ्याशी लग्न करायचं होतं पण..; संकर्षणने सांगितलेला खास किस्सा वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 1:22 PM

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने सोशल मीडियावर त्याच्या फॅनने सांगितलेला खास किस्सा शेअर केलाय (sankarshan karhade)

संकर्षण कऱ्हाडेने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. विषयांतर न करता थेट पोस्ट वाचा. संकर्षण लिहितो, "काल साताऱ्या मध्ये प्रयोगानंतर एक मॅडम भेटल्या त्यांच्याविषयी थोडं शेअर करतोय ..! वेळ असेल तर वाचा ..! त्यांनी म्हणे १२ वर्षांपूर्वी टेलिव्हिजन वरती माझं काम पाहिलं आणि घरी आईला सांगीतलं कि मला संकर्षण सोबतच लग्नं करायचंय.. त्यावर बारावीतल्या त्या पोरीला आई म्हणाली ; “अभ्यास करा….”"

संकर्षण पुढे लिहितो, "पुढे त्यांचं शिक्षण झालं , लग्नं झालं , दीड वर्षांचा त्यांना मुलगा आहे.. आणि आता त्या सातारा मध्ये असतात. काल प्रयोगाच्या निमित्ताने त्या आवर्जून मला भेटल्या.. त्यांचा नवरा त्यांना स्वतः असं म्हणाला कि , बाळ झोपलं असेल तर नक्की भेटून ये जा.. आणि आमची भेट झाली आणि त्यांनी मला हे सग्गळं स्वतः सांगीतलं… दीड वर्षांच्या झोपलेल्या बाळाला घरी ठेउन अगदी साध्या वेशात आलेली ती आई मला हे सगळं सांगुन गेली. कित्ती गोड आहे यार हे."

संकर्षण पुढे लिहितो, "प्रेक्षक आणि कलाकार ह्यांच्या अनेक वर्षं एकत्रं होणाऱ्या ह्या प्रवासाचंही मला कौतुक वाटलं…. त्यांना मला हे मनमोकळेपणाने सांगावं वाटलं ह्या भावनांचंही मला फार फार कौतुक वाटलं .. आणि बाळ झोपलं असेल तर त्यांना भेटून ये , बोल .. हे म्हणनाऱ्या त्यांच्या नवऱ्याच्या समजुतदारपणाचंही मला खूपच कौतुक वाटलं.. माझ्या नावावरुन त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव पण विष्णूचं ठेवलंय हे तर काहीच्या काही मस्तं वाटलं ….प्रेक्षकहो .. असंच प्रेम करत रहा .. भेटत रहा …. मी जबाबदारीने काम करीन. (त्यांचं नाव , फोटो मुद्दाम टाकला नाही पण पोस्टं मात्रं त्यांच्या परवानगीनेच करतोय!)"

टॅग्स :नाटकमराठीमराठी अभिनेता