Join us

एकाच मराठी चित्रपटात ३५ बालकलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2016 10:41 AM

या स्पर्धेच्या युगात आपली मुले मागे नाही पडावी या विचाराने पालक मुलांवर अपेक्षांचं ओझे टाकतात. त्यामुळे लहान मुलांचे बालपण ...

या स्पर्धेच्या युगात आपली मुले मागे नाही पडावी या विचाराने पालक मुलांवर अपेक्षांचं ओझे टाकतात. त्यामुळे लहान मुलांचे बालपण हरवत चालले का? हा मोठा प्रश्न सध्या समाजासमोर आ वासून उभा राहिला आहे. या परिस्थितीचा विचार करून दिग्दर्शक करिण गावडे यांनी सहा गुण हा चित्रपटातून मुलांच्या बालपणावर कसा परिणाम होतो यावर प्रकाश टाकला आहे. त्यामुळे या चित्रपटात किल्ला फेम अर्चित देवधर सहित ३५ बालकलाकारांनी अभिनय केला आहे.तसेच अमृता सुभाष व सुनिल बर्वे हे मुख्या भूमिकेत झळकणार आहेत. तर अतुल तोडणकर, प्रणव रावराणे, आरती सोळंकी या कलाकारांचादेखील या चित्रपटात समावेश आहे.या चित्रपटाची गाणी संगीतकार राज पवार व कपिल रेडकर संगीतबद्ध केली असून सुरेश वाडकर, कपिल रेडकर, रविंद्र खोमणे, राज पवार यांच्या आवाजात गाणी ऐकण्यास मिळणार आहे.