बॉलिवूड आणि टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता राहुल बेदी (Rakesh Bedi) यांची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. फोन कॉलच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यातून ७५००० रुपये लंपास केले आहेत. राकेश बेदींनी अशा लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला चाहत्यांना दिला आहे. राकेश बेदी यांनी म्हटले की, अनेक घोटाळेबाज लष्कराचे जवान असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करत आहेत. राकेश बेदी यांनी ओशिवरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, राकेश बेदींनी सांगितले की, मोठ्या फसवणुकीपासून वाचलो आहे. अनेक फ्रॉड लोक जवान असल्याचे भासवून लोकांना लुटत आहेत. अशा लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?राकेश बेदी यांना भारतीय लष्करातील असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीचा फोन आला आणि त्याने सांगितले की त्याला अभिनेत्याच्या पुण्यातील फ्लॅटमध्ये रस आहे. आपली फसवणूक झाल्याचे राकेश बेदी यांच्या लक्षात येईपर्यंत त्या व्यक्तीने त्यांच्या खात्यातून ७५००० रुपये लंपास केले होते. असे लोक रात्रीच्या वेळी फोन करतात असे त्यांनी सांगितले. जेणेकरून आपली फसवणूक झाल्याचे कोणाच्या लक्षात आले तरी तक्रार दाखल करण्यास उशीर होतो.राकेश बेदी यांनी पोलिसांना फसवणूक करणाऱ्याशी संबंधित तपशील जसे की त्याचे नाव, बँक खाते क्रमांक, फोटो आणि व्यवहाराचे तपशील दिले आहेत. राकेश यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी त्यांना सांगितले की, असे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वारंवार होत आहेत. सुदैवाने मी जास्त पैसे गमावले नाहीत.
वर्कफ्रंट...राकेश बेदी गेल्या ४ दशकांपासून सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. त्यांनी चश्मे बद्दूर, खट्टा मीठा आणि प्रोफेसर की पडोसन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय त्यांनी ये जो है जिंदगी, श्रीमान श्रीमती यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. उत्कृष्ट कॉमिक टायमिंग असलेल्या अभिनेत्यांमध्ये राकेश यांची गणना होते.