Join us

'अप्पी आमची कलेक्टर'मध्ये ७ वर्षांचा लीप, अप्पीनं निभावलं दिलेलं वचन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 2:02 PM

Appi Aamchi Collector : 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत एक नवा अध्याय सुरु होत आहे. मालिका आता ७ वर्षांची लीप घेत आहे.

'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Aamchi Collector ) मालिकेत एक नवा अध्याय सुरु होत आहे. मालिका आता ७ वर्षांची लीप घेत आहे. अप्पी आणि अर्जुन दोघेही ७ वर्ष आपल्या जीवनात वेगवेगळ्या वाटेवर जगत असताना आता नियती परत त्यांना समोर आणणार आहे. नुकतेच या मालिकेचा एक प्रोमोही समोर आला आहे. 

या प्रोमोत अप्पी अर्जुनला वचन देते की, ती अमोलला त्याचा वडिलांबद्दल कधीच काही सांगणार नाही. पण सात वर्षानंतर, अप्पी उत्तराखंडमधील अल्मोराला कलेक्टर म्हणून काम करत आहे. तेव्हा अर्जुन एका गुन्हेगाराच्या शोधात उत्तराखंडला येतो. अमोलचा रिझल्ट असल्याने तो देवाला रिझल्टसाठी नाही तर अप्पीला त्याच्या शाळेतील करामती कळू नये म्हणून प्रार्थना करतोय, मंदिरात घंटा वाजवण्यासाठी त्याचा हात पोहचत नाहीये. त्याचवेळेस अर्जुन तिकडे येऊन आपल्या खांद्यावर घेऊन अमोलला घंटा वाजवायला मदत करतो. 

अप्पी आणि अर्जुन यांच्या नवीन लूकबाबत चर्चा होताना दिसतेय आणि या प्रोमोला सुद्धा प्रेक्षकांची पसंती मिळतेय. या मालिकेत बालकलाकार साईराज केंद्रेने एंट्री घेतली आहे. साईराज हा या मालिकेत अप्पी आणि अर्जुनचा मुलगा अमोलचे पात्र साकारणार आहे. मालिकेत प्रेक्षकांना गोष्ट सात वर्षांनी पुढे गेलेली पाहायला मिळेल. अप्पीने मुलाला वडिलांपासून दूर ठेवण्याचे वचन निभावले पण, या छोट्या पावलांनी बाबांना शोधले…आता सात वर्षांपूर्वी तुटलेली नाती, पुन्हा जोडली जातील ? हे 'अप्पी आमची कलेक्टर' महाराष्ट्र दिन विशेष भाग १  मे  संध्याकाळी ७  वाजता फक्त आपल्या झी मराठीवर पाहावे लागेल.