Join us

'भाग्य दिले तू मला'मध्ये नवा ट्विस्ट; या अभिनेत्रीची मालिकेतून अचानक एक्झिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 11:06 IST

Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' मालिकेत राज आणि कावेरी यांच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. त्यामुळे प्रेक्षकही खूश आहेत. नुकताच त्यांचा विवाह सोहळा पार पडला आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील 'भाग्य दिले तू मला' (Bhagya Dile Tu Mala) या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेचे कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे. राज आणि कावेरी यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. सध्या मालिकेत राज आणि कावेरी यांच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. त्यामुळे प्रेक्षकही खूश आहेत. नुकताच त्यांचा विवाह सोहळा पार पडला आहे. आता कावेरी मोहित्यांच्या घरची सून झाली आहे. मात्र दुसरीकडे निवेदिता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. त्यामुळे चाहते नाराज झाले आहेत.

भाग्य दिले तू मला या मालिकेत निवेदिता सराफ राजवर्धनच्या आईची भूमिका साकारत आहेत. त्यांनी आपल्या प्रसंगी कणखर आणि प्रसंगी भावनिक अशा भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांचे हे पात्र प्रेक्षकांमध्ये खूप गाजले. परंतु आता निवेदिता सराफ मालिकेतून निरोप घेणार असल्याचे बोलले जात आहे. 

मालिकेत निवेदिता यांना कॅन्सर झाल्याचे दाखवण्यात आले आहे. तोही शेवटच्या स्टेजचा. त्यावर उपचार करणे शक्य आहे, मात्र त्यातून निवेदिता यांचा जीव वाचवू शकणार नाही असं डॉक्टरांनी सांगितले आहे. म्हणजे त्यांचा मृत्यू दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे निवेदिता मालिकेतून एक्झिट घेणार आहेत. मात्र प्रेक्षक नाराज झाले आहेत. त्यांच्या एक्झिटचं कारण अद्याप समोर आलेले नाही.

निवेदिता सराफ यांनी या मालिकेच्या आधी 'अग्गंबाई सुनबाई' आणि अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत काम केले. या मालिका प्रचंड गाजल्या. 

टॅग्स :निवेदिता सराफ