Join us

'मन धागा धागा जोडते नवा'मध्ये नवा ट्विस्ट, आनंदी आदर्शसोबत नाही तर सार्थकसोबत घेणार सातफेरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 6:05 PM

Man Dhaga Dhaga Jodte Nava : 'मन धागा धागा जोडते नवा' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेतील आनंदी आणि सार्थकच्या केमिस्ट्रीला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील आनंदी आणि सार्थकच्या केमिस्ट्रीला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. यात आनंदीची भूमिका अभिनेत्री दिव्या पुगावकरने साकारली आहे तर अभिषेक रहाळकरने सार्थकची भूमिका निभावली आहे. आता या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. 

मन धागा धागा जोडते नवा मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. आईच्या तब्येतीमुळे आनंदी आदर्शसोबत लग्न करण्यासाठी तयार होते. आदर्शचे देखील पहिले लग्न झाले होते त्यामुळे ही गोष्ट तो आनंदीसमोर मोकळेपणाने कबूल करतो.  तर आनंदी सुद्धा तिच्या आयुष्यातील घटनांचा खुलासा करते. त्यामुळे लवकरच मालिकेत आदर्श आणि आनंदीच्या लग्नाची लगबग सुरू झालेली पाहायला मिळणार आहे. मालिकेत या लग्नसोहळ्याचे शूटिंग नुकतेच पार पडले आहे. या लग्नात मात्र प्रेक्षकांना अपेक्षित असा ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे. 

सार्थकचे ज्या मुलीसोबत प्रेम असते हे त्याने डायरीत लिहून ठेवलेले असते. ही डायरी तो आदर्शपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण सार्थकची बहीण मात्र आनंदीचे लग्न सार्थक सोबतच व्हावे म्हणून प्रयत्न करत असते. सार्थकला होणारा त्रास ती जवळून अनुभवत असते. आदर्श आणि आनंदी दोघेही लग्नाच्या बोहल्यावर चढणार तेवढ्यात आदर्शला सार्थकबद्दल सगळं सत्य समजणार आहे. सार्थक ज्या मुलीसोबत प्रेम करतो ती दुसरी तिसरी कोणी नसून आनंदीच आहे हे सत्य त्याला उलगडणार आहे. म्हणूनच तो भर मंडपात आनंदीचे त्याच्यासोबत लग्न लावून देणार आहे. 
टॅग्स :स्टार प्रवाह