झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय नवा गडी नवं राज्य (Nava Gadi Nava Rajya) मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत सध्याच्या घडीला अनेक बदल करण्यात आले आहेत त्यामुळे ही मालिका चांगलीच चर्चेत आली आहे. या मालिकेत चिंगीची भूमिका साकारणारी साईशा भोईर हिची या मालिकेतून एक्झिट झाली आहे. बालकलाकार आरोही सांबरे हिने साईशाला रिप्लेस केलेले आहे. दरम्यान आता या मालिकेत राघवच्या बाबांची सुद्धा एन्ट्री झालेली पाहायला मिळणार आहे. मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, त्यात हे दोन कलाकार प्रेक्षकांच्या समोर आले आहेत.
राघवचे बाबा गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना सोडून गेले होते मात्र आता नात चिंगीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांची घरात एन्ट्री होत आहे. आपली नात, सून ,बायको, मुलगी यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्याचसाठी मी पुन्हा परतलोय अशी ते प्रतिक्रिया देतात. मात्र राघव त्यांना घरात घेण्यास मुळीच तयार नसतो. त्यामुळे ही मालिका एका वेगळ्याच वळणावर आल्याचे पाहायला मिळत आहे. राघवच्या बाबांची भूमिका अभिनेते संजय क्षेमकल्याणी साकारत आहेत. संजय क्षेमकल्याणी हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. अभिनयासोबतच सह दिग्दर्शक तसेच दिग्दर्शक म्हणून त्यांनी काही प्रोजेक्ट केलेले आहेत.
दूरदर्शनवरील मालिका, तेरा दिवस प्रेमाचे, पूर्ण सत्य, तुझ्या रुपाचं चांदणं, शुभ विवाह, दिनमान, साहेब, माझे मन तुझे झाले अशा हिंदी मराठी मालिकांसाठी त्यांनी काम केले आहे. आई कुठे काय करते या मालिकेत त्यांना एक छोटीशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. छोट्या छोट्या पण तेवढ्याच महत्वपूर्ण भूमिकेत संजय क्षेमकल्यानी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.