'रंग माझा वेगळा' मालिकेत येणार नवीन वळण; अखेर चौकोनी कुटुंब होणार पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 12:35 PM2022-02-08T12:35:49+5:302022-02-08T12:36:28+5:30
Rang Maza Vegla : रंग माझा वेगळा मालिकेत नवीन वळण पाहायला मिळणार आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील गेल्या कित्येक आठवड्यांपासून रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) मालिका टीआरपीच्या रेसमध्ये पहिल्या स्थानावर आहे. या मालिकेच्या सुरूवातीपासून कार्तिकी आणि दीपा यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली होती. काही कालावधीनंतर ते दोघे वेगळे झाले. त्या दोघांना दोन मुली झाल्या दीपिका आणि कार्तिकी. दीपिका कार्तिक सोबत राहत असली तरी त्याला माहित नाही आहे की ती त्याचीच मुलगी आहे. त्याला ती दत्तक घेतलेली मुलगी वाटत असते. तसेच दीपालाही दीपिका तिची मुलगी असल्याचे माहित नाही. दीपिका आणि कार्तिकीदेखील खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना आता या दोघांची केमिस्ट्री खूप भावते आहे. त्यामुळे हे चौकोनी कुटुंब कधी पूर्ण होणार, याची प्रेक्षक वाट पाहत आहेत.
मराठी सीरियल्स ऑफिशिएल या इंस्टाग्राम अकाउंटवर रंग माझा वेगळा मालिकेसंदर्भात नवीन अपडेट देण्यात आली आहे. यासोबतच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोन कोलाज असून एका फोटोत कार्तिक दीपा, दीपिका आणि कार्तिकीसोबत सेल्फी घेताना दिसतो आहे. तर दुसऱ्या फोटोत ते चौघे एकत्र दिसत असून सौंदर्या त्यांना पाहताना दिसते आहे. या फोटोवर कॅप्शन देण्यात आले आहे की, दीपा, कार्तिक, दीपिका, कार्तिकी चौकोनी कुटुंब आले एकत्र! मालिकेत हे खरेच घडणार आहे की, कोणी स्वप्न पाहत आहे, हे आगामी भागात स्पष्ट होईल.
रंग माझा वेगळा मालिकेत सध्या कार्तिक दीपिकाला घेऊन युएसला जायचे ठरवितो. मात्र दीपिका स्पष्ट नकार देते. त्यावर आयशा ठरविते की कार्तिकीला सांगून दीपिकाला युएसला जाण्यासाठी तयार करायचे. ती तसे कार्तिकीला सांगते. त्यानंतर कार्तिकी दीपिका पासून लांब राहण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आता दीपिका आणि कार्तिकीमध्ये दुरावा निर्माण होईल का हे आगामी भागात पाहायला मिळेल.