Join us

अभिज्ञाला पडली बॉलिवूड साँगची भूरळ; साडी नेसून बर्फाच्छदित डोंगरांमध्ये केलं भन्नाट रील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 16:22 IST

Abhidnya bhave: बर्फाळलेल्या प्रदेशात साडी नेसून बॉलिवूड गाण्यावर व्हिडीओ करावा ही अभिज्ञाची कित्येक काळापासूनची इच्छा होती. अखेर तिने तिच्या बकेट लिस्टमधली इच्छा पूर्ण केली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे (abhidnya bhave). गेल्या कित्येक वर्षांपासून अभिज्ञा मराठी कलाविश्वात सक्रीयपणे कार्यरत आहे. इतकंच नाही तर आता तिने थेट हिंदी मालिकाविश्वातही एन्ट्री केली आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांमध्ये चर्चेत येत असते. सध्या सोशल मीडियावर अभिज्ञाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या बकेट लिस्टमधली एक गोष्ट पूर्ण केली आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली अभिज्ञा सध्या तिच्या नवऱ्यासोबत मेहूल पै सोबत व्हेकेशन एन्जॉय करतीये. ही जोडी काश्मीरमध्ये त्यांच्या व्हेकेशनसाठी गेली असून येथील अनेक फोटो, व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्येच तिचा बॉलिवूड गाण्यावरील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अभिज्ञाने -9°c अंश सेल्सिअस तापमानामध्ये साडी नेसून एक रील केलं आहे. विशेष म्हणजे या गाण्यावर बर्फाच्छदित प्रदेशात साडी नेसून रील करावं अशी तिची इच्छा होती आणि ती तिने पूर्ण केली. अभिज्ञाने  'रहेना हैं तेरे दिल में' या सिनेमातील 'जरा जरा' या गाण्याच्या म्युझिकवर रील केलं आहे. 

दरम्यान, या व्हिडीओमध्ये अभिज्ञा कमालीची सुंदर दिसत असून तिने या रीलला एकदम बॉलिवूडचा टच दिला आहे. तिचा हा व्हिडीओ मेहूलने शूट केला आहे.

टॅग्स :अभिज्ञा भावेटेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकार