Join us

"अट्टल असलेला माणूस पण विठ्ठल दिसतो..", संजय जाधवला असं काही म्हणाला कुशल बद्रिके

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 14:28 IST

Kushal Badrike : कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक संजय जाधवबद्दल लिहिले आहे.

कुशल बद्रिके मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने आपल्या विनोदी कौशल्याने रसिकांना खळखळून हसविले आहे. त्याला चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. त्याचे सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. तो सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असतो. नुकतेच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक संजय जाधवबद्दल लिहिले आहे.  

कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर संजय जाधवसोबतचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, संजू दादा म्हणजे “यारो का यार है” ! जर आपल्या सिनेमाला DOP म्हणून “द-संजय जाधव” आहेत तर माझ्यासारखा दिसायला “अट्टल” असलेला माणूस पण “विठ्ठल” दिसतो. ही त्याच्या सिनेमॅटोग्राफीची कमाल आहे. त्यात तुला स्वतःच असं वेगळं वय नाही, सिनेमातल्या ५ वर्षाच्या मुलाला ही तू त्याचा दोस्त वाटतोस आणि शशांक शेंडे सरांसारखे सीनियर्ससुद्धा तुझ्याकडे मन मोकळं करतात. निर्मिती सावंत ताई सारखी जागतिक दर्जाची एक्ट्रेस तुझ्या सिनेमात काम करायचा हट्ट करते. काहीतरी जादू आहे तुझ्यात हे नक्की .

कुशलने पुढे म्हटले की, “संजू दादा” तू सोबत असलास ना की सिनेमा तर सुंदर होतोच पण सिनेमाच्या आठवणी सुद्धा तितक्याच सुंदर छापल्या जातात मनात. ही रिल आपल्या ह्या सिनेमाच्या खूप आठवणी सांगत राहील, आपल्यालाच. कुणालाही त्याची बाइक न देणाऱ्या पण आम्ही चालवली तरी चालणाऱ्या संदीप धुमाळ उर्फ “लाला” तुला आमचे तुझ्यावर प्रेम आहे आणि आपल्या व्यस्त वेळातून आमच्या ह्या टाइमपासला प्राधान्य देणाऱ्या एडिटर किरण माडरे तुलाही लव्ह यू.

टॅग्स :कुशल बद्रिकेसंजय जाधव