Join us

गर्लफ्रेंड आहे का? आदेश बांदेकरांच्या लेकाला चाहत्याचा प्रश्न; अभिनेता म्हणतो..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 18:56 IST

Soham bandekar: अलिकडेच सोहमने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी Ask me anything  हे सेशन घेतलं.  यावेळी त्याने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली.

'होम मिनिस्टर' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे आदेश बांदेकर (adesh bandekar). त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या लेकानेही कलाविश्वात पदार्पण केलं आहे. अलिकडेच नवे लक्ष्य या मालिकेच्या माध्यमातून सोहम बांदेकरने ( soham bandekar) मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. विशेष म्हणजे या पहिल्याच मालिकेतून तो लोकप्रिय झाला. त्यामुळे आज त्याचा बऱ्यापैकी चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. यामध्येच एका चाहत्याने थेट त्याला गर्लफ्रेंडविषयी प्रश्न विचारला आहे.

अलिकडेच सोहमने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी Ask me anything  हे सेशन घेतलं.  त्यामुळे चाहत्यांनीही बिनधास्तपणे त्यांच्या मनातील प्रश्न सोहमला विचारले आणि त्यानेही त्यांची उत्तरं दिली. यामध्येच एका चाहत्याने तुझी गर्लफ्रेंड आहे का? असा प्रश्न विचारला. यावर सोहमने भन्नाट उत्तर दिलं.

'तुझी गर्लफ्रेंड आहे का?' असा प्रश्न चाहत्याने सोहमला विचारला. त्यावर, '...पण, माझ्याकडे सुंदर आयुष्य आहे आणि चांगले मित्रसुद्धा', असं उत्तर सोहमने दिलं. विशेष म्हणजे यावेळी त्याने पण म्हणत जो सस्पेन्स ठेवला. त्यामुळे खरोखरच त्याची गर्लफ्रेंड आहे की काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

दरम्यान “नवे लक्ष्य” या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण करणारा सोहम अलिकडेच बाईपण भारी देवा या सिनेमात कॅमियो रोलमध्ये दिसला होता. या सिनेमात त्याची आई अभिनेत्री सुचित्रा बांदेकर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसिनेमाआदेश बांदेकर