Join us

'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! ही मालिका घेणार निरोप?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 9:00 AM

'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' माालिकेची वेळ ठरली. या मालिकेमुळे स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका निरोप घेणार असल्याची शक्यता आहे

स्टार प्रवाहवर नवी मालिका प्रेक्षकांच्या चर्चेत आहे. या मालिकेच्या प्रोमोपासूनच सर्वांना या मालिकेची उत्सुकता आहे. ही मालिका म्हणजे 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत'. निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वी भेटीला आला. प्रोमोपासूनच प्रेक्षकांना ही मालिका कधी सुरु होणार, याची उत्सुकता होती. अखेर काल या मालिकेचा नवीन प्रोमो लॉंच झाला. या प्रोमोत मालिकेची तारीख आणि वेळ कळवण्यात आली आहे. पण यामुळे स्टार प्रवाहवरील एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची शक्यता आहे.

या तारखेपासून या वेळी सुरु होणार मालिका

'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेचा नवीन प्रोमो काल लॉंच झाला. या प्रोमोत पुन्हा एकदा निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांचा जबरदस्त अभिनय बघायला मिळतोय. ही मालिका २ डिसेंबरपासून  दुपारी २.३० वाजता स्टार प्रवाहवर बघायला मिळणार आहे. या मालिकेची वेळ आणि तारीख निश्चित झाल्याने स्टार प्रवाहवरील एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचा धक्का प्रेक्षकांना बसलाय. 

ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या या नवीन मालिकेमुळे सध्या २.३० ला सुरु असणारी 'आई कुठे काय करते' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची दाट शक्यता निर्माण झालीय. सध्या 'आई कुठे काय करते' मालिकेत समृद्धी बंगला परत मिळवण्यासाठीचा ट्रॅक सुरु आहे. त्यामुळे हा ट्रॅक संपल्यावर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता आहे. असंही सांगण्यात येतंय की, 'आई कुठे काय करते' मालिका सध्या तात्पुरता निरोप घेऊन पुढे मालिका काही वर्षांचा लीप घेऊन नंतर पुन्हा सुरु होईल.

टॅग्स :निवेदिता सराफटेलिव्हिजनस्टार प्रवाहआई कुठे काय करते मालिका