Join us

Aai Kuthe Kay Karte : ‘कुणी नसलं तरी चालेल ...तुझी तू रहा..’, अरूंधतीचा हा व्हिडीओ नक्की पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 5:11 PM

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अरूंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिची एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय.

‘आई कुठे काय करते’  (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरची गाजत असलेली मालिका. मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. अर्थात तूर्तास बातमी मालिकेची नाही तर मालिकेत अरूंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिच्याबद्दलची आहे. मधुराणीची एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय. होय, पडद्यावरच्या अरुंधतीच्या आयुष्याशी काहीशी संबंधीत असणारी कवयित्री संजीवनी बोकील यांची कविता अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरनं  सोशल मीडियावर शेअर केली आहे.

‘कुणी नसलं तरी चालेल ...तुझी तू रहा..’असं या कवितेचे नाव आहे. मधुराणीनं अतिशय उत्कृष्टपणे ही कविता सादर केली आहे. चाहत्यांनी तिला भरभरून दाद दिली आहे. खूपच मस्त, अप्रतिम मधुजी अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. ही कविता अरूंधतीसाठी लिहिली आहे का? असा प्रश्न ही कविता ऐकून चाहत्यांना पडला आहे.

अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. तिचे विविध फोटो आणि व्हि़डिओ शेअर करत असते. मालिकेसंदर्भातील अनेक पोस्टही ती शेअर करत असते.  

 ‘आई कुठे काय करते’ या मालिकेबद्दल बोलायचं तर अरूंधतीने  देशमुखाचं घर आता कायमचं सोडलं आहे.  अनिरूद्धपासून घटस्फोट घेतल्यानंतर अरुंधतीने नव्या आयुष्याला सुरूवात केली आहे. ही अरुंधती आता सक्षमपणे स्वत: च्या पायावर उभी राहू पाहतेय. तिचं नवीन गाण देखील आलं आहे. सगळीकडे तिचं कौतुक होत आहे. नुकतंच अनिरुद्धने अरुंधतीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे आता तिने देशमुखांचं घर सोडलं आहे.शिवाय घरावरील हक्कही सोडला आहे. परंतु, हे घर सोडल्यानंतरसुद्धा तिला आशुतोषची खंबीर साथ मिळाली आहे. यांच्यातील मैत्री आणखीनच घट्ट होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे हळूहळू का होईना आशुतोषच्या मनात अरूंधतीविषयी प्रेम भावना निर्माण झाली आहे. पण तो कधी व्यक्त झाला नाही. मात्र आता थेट देशमुख कुटुंबासमोर आशुतोष अरुंधतीवरील आपल्या प्रेमाची कबुली देणार आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकामधुराणी प्रभुलकर