Aai Kuthe Kay Karte: अखेर थाटामाटात होणार अरुंधती आणि आशुतोषचे लग्न; ईशाने मागितले हे वचन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 05:49 PM2023-02-16T17:49:17+5:302023-02-16T17:49:46+5:30
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. अखेर या मालिकेत अरुंधती आणि आशुतोषसोबत लग्न होणार आहे.
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. अखेर या मालिकेत अरुंधती आणि आशुतोषसोबत लग्न होणार आहे. मालिकेत सध्या अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची लगबग सुरू आहे. आशुतोषबरोबर लग्न करण्याचा निर्णय अरुंधती सांगते. मात्र तिचा निर्णय कांचन, अभि आणि अनिरुद्धला खटकतो. मात्र आप्पा, संजना, यश मात्र अरुंधतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. अनिरुद्ध दोघांच्या लग्नात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतो. पण अखेर या सगळ्यांवर मात करून आशुतोष आणि अरुंधतीचं लग्न थाटामाटात पार पडणार आहे. मात्र ईशा आशुतोषकडे एक वचन मागते.
नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात पाहायला मिळाले की, आप्पा अरुंधतीची पाठवणी देशमुखांच्या घरातून करणार असल्याचा निर्णय सांगतात. आप्पांच्या निर्णयाला अभि आणि अनिरुद्ध सोडून सगळे होकार देतात.दरम्यान अनिरुद्ध मीडियाला खोटी माहिती देऊन आशुतोष आणि अरुंधतीविषयी छापून आणतो. यामुळे सगळ्यांनाच त्रास होतो. अनिरुद्धला वाटतं की आता अरुंधती लग्न न करण्याचा निर्णय घेईल. पण ती लग्नाचा निर्णय बदलत नाही. इकडे शेजारी अरुंधतीच्या निर्णयावर तिचं समर्थन देतात. त्यामुळे आता कांचन देखील लग्नासाठी तयार होते. दुसरीकडे ईशा आणि अरुंधतीकडे जाऊन तिच्याशी बोलते. दोघींमध्ये भावुक संभाषण होतं.
मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळणार आहे की, ईशा आशुतोषच्या घरी जाते आणि आशुतोषची बोलते. ती सर माझ्या आईला खूप सुखात ठेवा. आम्ही सगळे खूप वाईट वागलो आहोत तिच्याशी, असे वचन मागते. त्यावर आशुतोष तिला मी तुझ्या आईच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही, असे वचन देतो. ईशा आणि आशुतोषमधील हे संभाषण ऐकून सगळेच इमोशनल होतात. तर देशमुखांच्या घरात दोघांच्या लग्नाची जोरदार तयारी होते. ईशा देशमुखांचा व्हॉट्स अॅप ग्रुप तयार करून वेडिंग प्लानर बनते. मात्र अनिरुद्ध आणि अभि याच्या विरोधातच आहेत. त्यामुळे आता लग्नात अनिरुद्ध आणखी काही विघ्न आणणार का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.