Join us

'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधती देणार अनघाला धीर, देशमुखांना लगवणार खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 12:24 PM

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत आशुतोष आता अपघाताच्या धक्क्यातून बरा होतो आहे. त्यामुळे सध्या अरुंधती आनंदात आहे. पण तिचा हा आनंद अनिरुद्धला बघवत नाहीय. आशुतोष रुग्णालयात मृत्यूशी लढा देत असताना जो अनिरुद्ध तिला आशुतोषसोबत लग्न कर असा सल्ला देतो. तोच तिच्या आनंदावर विरजण घालण्याचा प्रयत्न करतो आहे. दरम्यान आता घरात अनघाला सगळेच जण ऑर्डर देत सुटतात. त्यात तिची धांधळ उडते आहे. अशात आता तिला धीर देण्यासाठी अरुंधती येणार आहे.

आई कुठे काय करते मालिकेत अनिरुद्ध अरुंधतीच्या विरोधात प्लान करण्यासाठी अभिचा वापर करतो. अभि सुरुवातीपासून अनिरुद्धच्या बाजूने आहे याचाच फायदा अनिरुद्ध घ्यायचे ठरवतो. अनिरुद्ध त्याला अरुंधती विरोधात भडकवण्याचे काम करतो. अनिरुद्ध पुन्हा एकदा अरुंधतीचे पाय खेचताना दिसणार आहे.आई कुठे काय करते मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत पाहायला मिळत आहे की, अनघा घरात सर्वांना काय हवं आहे ते देत आहे. यात तिची तारांबळ उडताना दिसते आहे. तितक्यात तिथे संजना येते आणि अनघाला तिचा धक्का लागतो. अनघाच्या हातातील कप पडतो आणि फुटतो. त्यानंतर अनघा रडायला लागते. सर्वांची माफी मागते. तुटलेला कप उचलत असताना तिथे अरुंधती येते आणि तिला धीर देते.

त्यावेळी अरुंधती अनघाला म्हणते की, उठ अनघा, उठ आधी. यश हे जरा आवरतोस. अनघा रडू नकोस तू सर्वांना मदत करते. स्वतःची कामं सांभाळून तू इतरांची काळजी घेतेस.  कधी उशीर झाला काही चुकलं तर अपराधी वाटून घेऊ नकोस. सॉरी तू नाही इतरांनी तुला म्हणायला पाहिजे.  अरुंधतीने देशमुखांच्या कुटुंबात येऊन अनघाची बाजू घेऊन देशमुखांना खडेबोल लावल्यानंतर आता घरात काय घडणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका