Join us

अखेर अभीने हात जोडून मागितली अरुंधतीची माफी; आशुतोषसोबतच्या नात्याचाही केला स्वीकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 6:37 PM

Aai kuthe kay karte:अरुंधती आणि आशुतोष यांच्यात मैत्री झाल्यापासून अभिषेकने सातत्याने त्या नात्याचा विरोध केला.

टीआरपीच्या शर्यतीत कायम प्रथम स्थानावर असलेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte). या मालिकेतून एका गृहिणीची संघर्षकथा उत्तमरित्या सादर केली आहे. चौकटीच्या आत बांधल्या गेलेल्या स्त्रीला तिचं स्वातंत्र्य मिळालं तर की कोणतीही अशक्य गोष्ट सहज शक्य करुन दाखवू शकते हे त्यातून दिसून येतं. या मालिकेतील अरुंधतीचा प्रवास प्रेक्षकांना विशेष आवडला असून सध्या या मालिकेतील चढउतारही चाहत्यांच्या नजरा खिळवून ठेवत आहेत. यामध्येच आता मालिकेत एक नवं वळण आलं आहे.

अरुंधती आणि आशुतोष यांच्यात मैत्री झाल्यापासून अभिषेकने सातत्याने त्या नात्याचा विरोध केला. इतकंच नाही तर अनिरुद्धची साथ देत अरुंधतीच्या दुसऱ्या लग्नाला कडाडून विरोध केला. अभिचं हे वागणं पाहून अनघाने सातत्याने त्याची समजूत काढायचा प्रयत्न केला. मात्र, तिलाही त्याने अनेकदा झुगारलं. मात्र, अरुंधती देशमुखांच्या घरातून कायमची बाहेर पडल्यानंतर अभिला त्याची चूक उमजली आहे. अखेर त्याने जाहीरपणे आपल्या आईची माफी मागितली आहे.सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेक, अरुंधती आणि आशुतोष यांची घरी जाऊन माफी मागतो. विशेष म्हणजे त्याने घेतलेल्या या निर्णयामुळे अनिरुद्धलाही धक्का बसला आहे.

दरम्यान, अभिला खरंच त्याची चूक उमगली आहे की, अरुंधतीला त्रास देण्यासाठी  त्याने हा नवा डाव आखला आहे. हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, अभिच्या या वागण्यामुळे आता देशमुखांच्या घरातील जवळपास साऱ्यांनीच आशुतोष आणि अरुंधतीच्या नात्याचा स्वीकार केला आहे. केवळ अनिरुद्धचाच विरोध आहे.  

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनसेलिब्रिटी