Join us

आई कुठे काय करते: आप्पांच्या खऱ्या आयुष्यातील लेकीला पाहिलंत का?, तिच्या लग्नातला व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 8:15 PM

आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेतील आप्पांच्या लेकीच्या लग्नातला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नाचा मौसम सुरू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण अनेक सेलिब्रेटींनी लग्नगाठ बांधलीय. मागील वर्षी आई कुठे काय करते मालिकेतील आप्पा म्हणजेच  ज्येष्ठ अभिनेते किशोर महाबोले यांच्या मुलीचा धुमधडाक्यात लग्न सोहळा पार पडला. किशोर यांच्या मुलीचं नाव सृष्टी महाबोले असं आहे. किशोर यांच्या मुलीचं लग्न गेल्या वर्षी जरी पार पडलं असलं तरीही  सध्या त्यांच्या मुलीच्या लग्नातील बाप-लेकीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत किशोर महाबोले यांची लेक मुंडावळ्या लावून, नऊवारी साडीत तिच्या लग्नविधीसाठी तयार दिसतेय. तसेच बाबा लग्नासाठी व्यवस्थित तयार झालेयेत का हेही ती बघतेय. याशिवाय किशोर या व्हिडीओत भावूक झालेले ही दिसून आले. त्यांचा हा सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होतो आहे.

किशोर यांच्या लेकीच्या लग्नातले आणखी काही फोटोज आणि व्हिडीओजही देखील समोर आले आहे. जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  

किशोर महाबोले हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते आहेत. सध्या ते छोट्या पडद्यावरील सर्वांचीच लाडकी मालिका म्हणजे आई कुठे काय करते या मालिकेतील आप्पा हे पात्र साकारत आहेत. त्यांची आप्पाची भूमिका घराघरात पोहचली आहे. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका