Join us

"निरोप देताना खूप जड जातंय", 'आई कुठे काय करते' संपल्यानंतर अभिषेकची पोस्ट, म्हणाला- "समृद्धी बंगल्याचे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 12:51 IST

'आई कुठे काय करते' मालिकेत अभिषेकची भूमिका साकारणाऱ्या निरंजन कुलकर्णीनेदेखील पोस्ट शेअर केली आहे. 

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका. या मालिकेने अल्पावधीतच मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील अरुंधती प्रेक्षकांना आपल्याच घरातील वाटली. तर देशमुख कुटुंबीयांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली. ५ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता ही मालिका निरोप घेत आहे. या मालिकेचं शूटिंगही संपलं आहे. मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केल्या आहेत. 'आई कुठे काय करते' मालिकेत अभिषेकची भूमिका साकारणाऱ्या निरंजन कुलकर्णीनेदेखील पोस्ट शेअर केली आहे. 

निरंजनने सेटवरील त्याच्या मेकअप रुममधील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो अभिषेकच्या लूकमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत निरंजनने अभिषेकला निरोप देताना भावुक झाल्याचं म्हटलं आहे. "एवढे वर्ष मला सांभाळून घेतलेल्या या makeup room ला निरोप देताना खूप जड जात होतं. माझी ही छोटीशी रूम मनात खूप मोठी जागा करून गेली. आम्ही इथे केलेल्या मजा, मस्ती ,आठवणी, तालीम आणि माझा रोजचा जेवणाचा ठरलेला एक कोपरा कायम स्मरणात राहतील. खूप खूप आभार आमच्या समृद्धी बंगल्याचे. बाय बाय अभी दादा...काळजी घे", असं कॅप्शन निरंजनने या पोस्टला दिलं आहे. निरंजनच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 

२३ डिसेंबर २०१९ रोजी 'आई कुठे काय करते'  मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित करण्यात आला होता. मधुराणी प्रभुलकरने या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारली. तर मिलिंद गवळी अनिरुद्ध आणि रुपाली भोसले संजनाच्या भूमिकेत होती. अपूर्वा गोरे, निरंजन कुलकर्णी, अभिषेक देशमुख या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. आता ५ वर्षांनी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ३० डिसेंबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.  

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकारमराठी अभिनेता