Join us

आप्पांच्या रिअल लाइफ कांचनला पाहिलं का? पहिल्यांदाच शेअर केला पत्नीसोबतचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 07:00 IST

Kishor mahabole : या मालिकेतील आप्पा आणि कांचन या जोडीवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. मात्र, पहिल्यांदाच आप्पांनी त्यांच्या रिअल लाइफ पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे.

'आई कुठे काय करते' या मालिकेने लोकप्रियतेची एक वेगळीच उंची गाठली आहे. उत्तम कथानकासह त्याला कलाकारांचा साजेसा अभिनय यामुळे ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यामुळेच या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना आपलासा वाटतो. याच कारणास्तव या कलाकारांच्या प्रोफेशनल लाइफसह त्यांच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेण्यासाठीही नेटकरी उत्सुक असतात. या मालिकेतील आप्पा आणि कांचन या जोडीवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. मात्र, पहिल्यांदाच आप्पांनी त्यांच्या रिअल लाइफ पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे.

आई कुठे काय करते या मालिकेत आप्पा आणि कांचन या जोडीला विशेष लोकप्रियता मिळत आहे. त्यांच्यात होणारी भांडणं, कांचनचा लटका राग, आप्पांचा समजूतदारपणा यामुळे ही जोडी लोकप्रिय झाली. मात्र, पहिल्यांदाच आप्पांनी म्हणजेच अभिनेता किशोर महाबोले यांनी त्यांच्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला.

किशोर महाबोले सोशल मीडियावर फारसे सक्रीय नाहीत. मात्र, वाढदिवसाचं निमित्त साधत त्यांनी पत्नीसोबतचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ही जोडी प्रचंड आनंदात असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे किशोर महाबोले यांच्याप्रमाणेच त्याची पत्नीदेखील अत्यंत साधी आणि सोज्वळ असल्याचं दिसून येतं. सध्या या फोटोवर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पडत आहे. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार