मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी (Milind gawali). चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांतून मिलिंद यांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. सध्या ते आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्ध ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. ते साकारत असलेली भूमिका निगेटिव्ह असली तरी प्रेक्षकांनी त्यांना भरभरुन प्रेम दिलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही त्यांच्या प्रत्येक पोस्टला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो. अलिकडेच त्यांनी मुकबधिर व्यक्तींसाठी एक छानशी पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेत येत आहे.
"Mime म्हणजे मुकाभिनय करणारा कलाकार. काही दिवसांपूर्वी आमच्या “आई कुठे काय करते” चा यश म्हणजेच आमचा अभिषेक देशमुख @abhisheksdeshmukh जो वर्षापूर्वीच त्याच्या पत्नीसह @mekrutikadeo ठाण्यात shift झाला. कांचन आई सोडल्या तर आम्ही सगळेच मुख्य कलाकार, ठाण्यात शिफ्ट झालो, जो काही थोडा वेळ family साठी मिळतो तो ठाण्यातल्या ठाण्यातच फिरून आम्ही सगळेच घालवतो. तर, काही दिवसांपूर्वी अभिषेक म्हणाला की , तो त्याच्या पत्नीला घेऊन एका वेगळ्याच रेस्टॉरंटमध्ये गेला होता आणि मला म्हणाला “बाबा तुम्हाला तिथे जायला आवडेल तुम्ही नक्की जा “ आणि माझ्या पोरांनी सांगितलेलं सहसा मी टाळत नाही, त्या Restaurant नाव आहे "मदिरा अंड माईम. आता मदिरेशी माझा काही संबंध नाही, पण माईम Mime शी नक्कीच आहे. आणि खरच किती इंटरेस्टिंग interesting अशी जागा आहे ही . इथे सगळे मूकबधिर काम करतात. मी दिपा बरोबर तिथे गेलो आणि मला खूपच छान वाटलं. तिथे सगळ्यांचे खूप हसतमुख चेहरे, काहीही न बोलता, गणेश याने मला विचारले “काय हवं आहे आपल्याला खाण्यासाठी “ मी त्याला म्हटलं “मदिरा सोडून काहीही दे “ तेही मी एक अक्षर न बोलता त्याला ते कळलं, तो मनसोक्तं हसला आणि त्याने छान चविष्ट बँड गार्लिक सूप Burnt Garlic Soup मला खूप प्रेमाने आणून दिलं , एकमेकांशी न बोलता आम्ही खूप गप्पा मारल्या, खूप हसलो. त्या सगळ्यांशी छान मैत्री झाली, फोटो व्हिडिओ काढून झाले, एकदम मज्जा आली", असं मिलिंद गवळी म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "खूप वर्षांपूर्वी दादरला संध्याकाळी सहा वाजता पोर्तुगीज चर्च जवळ चार-पाच मूकबधिर मुलं भेटायचे, मी क्लास वरून परत येताना दररोज त्यांना पाहायचो, एकदा मी त्यांच्यामध्ये सामील झालो, मग आमच्या खूप छान गप्पा व्हायच्या, खूप चेष्टा मस्करी व्हायची, खूप हसायचो आणि ते सगळं एक अक्षरही न बोलता, एक अक्षरही न ऐकता, फक्त sign language ने, मी आजही ते सगळं miss करतो . या मुलांना परवा या रेस्टॉरंट मध्ये भेटून छान वाटलं. वाटलं ज्यांनी कोणी हे रेस्टॉरंट काढलं त्याला खरंच सलाम, अशा Job Creation, ची आज गरज आहे. आपल्याकडे मूकबधिर मुलांसाठी खूप कमी Job Opportunitiesआहेत. मदिरा अँड माईम च्या सगळ्या Staff ला माझ्या खूप खूप शुभेच्छा."
दरम्यान, मिलिंद गवळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. त्यामुळे बऱ्याचदा ते त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडींचे अपडेट चाहत्यांना देत असतात. यात काही मजेशीर किस्सेदेखील ते शेअर करतात.