Join us  

'हा सिनेमा बघितल्यावर दोन दिवस मी अस्वस्थ होतो..'; मिलिंद गवळींनी सांगितला विलक्षण अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 4:01 PM

मिलिंद गवळी यांनी आई कुठे काय करते त्यांच्या एका सिनेमाविषयीची आठवण शेअर करत व्यसनामागील वास्तव मांडलं आहे (milind gawali)

'आई कुठे काय करते' फेम अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर सतत त्यांच्या नवनवीन सिनेमांबद्दल पोस्ट लिहित असतात. मिलिंद गवळींनी नुकतंच सोशल मीडियावर त्यांच्या 'अग्निपंख' सिनेमाविषयीची आठवण शेअर केली. मिलिंद गवळी लिहितात, "मुंबईतले सगळ्यात मोठे कॅमेरा आणि इक्विपमेंट चे वितरक बाबुभाई, आमच्या अनेक मालिकांमध्ये आणि सिनेमांमध्ये बाबुभाई यांचा कॅमेरा भाड्याने यायचा, त्यामुळे अनेक वर्ष त्यांचा परिचय होता, त्यांना सिनेमा निर्मिती करायची होती, त्यांनी हिंदी चित्रपटाची निर्मिती केली होती त्यांना मराठी चित्रपट करायचा होता.

 मिलिंद गवळी पुढे लिहितात, "राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले दिग्दर्शक रमेश मोरे यांच्याबरोबर त्यांनी दोन चित्रपट केले, दोन्ही चित्रपटाचे कॅमेरामन समीर आटले होते, आणि त्यांच्या दोन्ही चित्रपटांमध्ये मी प्रमुख भूमिकेत होतो, त्यातला हा एक ड्रग्ज वर आधारित चित्रपट अग्निपंख, या चित्रपटाचं शूटिंग अगदी गल्ली बोळांमध्ये कचऱ्याच्या कुंडीमध्ये नाल्यांमध्ये जितक्या ठिकाणी गलिच्छ वातावरण असेल त्या वातावरणामध्ये याच शूटिंग झालं आहे, ट्रॉम्बे च्या एस एल स्टुडिओमध्ये घराचं शूटिंग झालं, त्याच्या व्यतिरिक्त जे काही शूटिंग झालं ते सगळं प्रत्यक्ष झोपडपट्टी आणि वस्त्यांमध्ये झालं."

 मिलिंद गवळी पुढे लिहितात,  "सामान्य माणूस आणि कधीही ते विश्व पाहिलं नसेल अशा विश्वामध्ये या चित्रपटाचं शूटिंग व्हायचं, एकदा का नशेची लथ लागल्यानंतर, या व्यक्तीला कशाच भान राहायचं नाही आणि तो कुठेही रस्त्याच्या कडेला पडलेला असायचा, बरेच वेळेला आपण रस्त्याने जाता येता अशी माणसं पहात असतो की रस्त्याच्या कडेला पडलेली असतात, ही माणसं सकाळी घर सोडताना अगदी व्यवस्थित आपल्या कामाला जातात घरी यायच्या वेळेला नशा करतात आणि मग रस्त्याच्या कडेला पडलेली असतात त्यांचे घड्याळ पाकीट त्यांच्याकडे जे काही पैसे असतात ते चोरीला जातात, किती तासानंतर हे नशीब न बाहेर येतील सांगता येईल घरी आल्यानंतर त्यांच्याकडे काहीच नसतं आणि ठिकाणी जखमा झालेल्या असतात, परत ते व्यवस्थित होतात आणि परत कामाला जातात परत नशा करतात आणि नंतर ते इतके व्यसनी होतात की त्यांना ते व्यसनातन बाहेर काढणे अशक्य होते, घराची संसाराची वाहत आहात होते."

मिलिंद गवळी  शेवटी लिहितात, "समीर आटले यांनी उत्कृष्ट चित्रीकरण केला आहे या चित्रपटाचं, रमेश मोरे यांचे दिग्दर्शन पण खूपच भारी आहे, realistic subjects करण्याचा त्यांचा हातखंडा आहे, champion नावाच्या त्यांना चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होतं, हा अग्निपंख इतका Harsh आणि hard hitting झाला आहे, मी त्याचा ट्रायल शो बघितल्यानंतर दोन दिवस डिस्टर्ब disturbed होतो ,असा पिक्चर चालवण्यासाठी कुठलाही वितरक पुढे आला नाही, किंवा कुठल्याही वाहिनीने त्याचे राईट्स घेतले नाहीत, अजूनही तो लोकांपर्यंत पोहोचलेला नाहीये, पूजा नायक या अभिनेत्रीने या चित्रपटांमध्ये इतकं भारी काम केलं आहे की तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला हवा."

टॅग्स :मिलिंद गवळीआई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजन