सोशल मीडियावरचा ट्रेंड रोज बदलत असतो. अनेक गाणीही सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या 'आझाद' या बॉलिवूड सिनेमातील 'उई अम्मा' गाण्याची चर्चा आहे. हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग असून इन्स्टाग्रामवर या गाण्यावरचे रील्स व्हायरल होत आहेत. या गाण्यावर आता आई कुठे काय करते फेम अभिनेत्री अपूर्वा गोरेने रील व्हिडिओ बनवला आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेत ईशाची भूमिका साकारून अपूर्वा घराघरात पोहोचली. अपूर्वा सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ती फोटो शेअर करताना दिसते. आता अपूर्वाने 'उई अम्मा' या गाण्यावर रील बनवला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अपूर्वाने साडी नेसून या ट्रेंडिंग गाण्यावर रील बनवला आहे. या गाण्याच्या हुक स्टेप करताना ती दिसत आहे. अपूर्वाचा हा व्हिडिओ चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.
'आझाद' (Azad Movie) या चित्रपटातून अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण (Aman Devgan) आणि रवीना टंडनची मुलगी राशा थडानी(Rasha Thadani)ने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील 'उई अम्मा' गाणं खूपच लोकप्रिय ठरलं. या गाण्यावर राशाने खूपच दमदार डान्स केलाय. तिचे खूप कौतुक होत आहे.