Join us

तोंडाला स्कार्फ अन् भर उन्हात शेतात काम, 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीला ओळखलं का?

By कोमल खांबे | Updated: February 25, 2025 14:17 IST

सध्या अशाच दोन अभिनेत्रींचा फोटो व्हायरल होत आहे. या अभिनेत्रींच्या चेहऱ्यावर स्कार्फ आहे. त्यामुळे त्यांना ओळखणंही कठीण झालं आहे.

सेलिब्रिटींचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच दोन अभिनेत्रींचा फोटो व्हायरल होत आहे. या अभिनेत्रींच्या चेहऱ्यावर स्कार्फ आहे. त्यामुळे त्यांना ओळखणंही कठीण झालं आहे. या दोघीही टीव्ही अभिनेत्री आहेत. भर उन्हात त्या शेतात काम करताना दिसत आहेत. 

फोटोत दिसणाऱ्या या अभिनेत्री 'आई कुठे काय करते' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. त्या दोघींचा शेतातील काम करतानाचा फोटो समोर आला आहे. त्यांच्या हातात फावडा आणि टोपली दिसत आहे. तोंडाला स्कार्फ बांधल्यामुळे त्यांना ओखळता येत नाहीये. पण, या अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे आणि कौमुदी वलोकर आहे. कौमुदी अश्विनीच्या शेतात काम करण्यासाठी गेली होती. याबाबत अश्विनीने पोस्ट शेअर केली आहे. 

"यावर्षी हळद काढायला खास माणूस आलेला…हळद खरे तर नानांना आवडणारी गोष्ट, म्हणून अजूनही आम्ही हळद करतो", असं अश्विनीने म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. दरम्यान, आई कुठे काय करते या मालिकेने काही दिवसांपूर्वीच निरोप घेतला आहे. या मालिकेत अश्विनीने अनघा ही भूमिका साकारली होती. तर कौमुदी आरोहीच्या भूमिकेत होती. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकारअश्विनी महांगडे