Join us  

“...तर लग्न मोडतील”, मधुराणी प्रभुलकरचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, “पुरुषांनी स्त्रियांना कमी लेखणं...”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 5:10 PM

'आई कुठे काय करते' फेम अरुंधतीचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, "तिच्याबरोबर संसार करायचा असेल तर..."

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधतीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ही भूमिका साकारुन अभिनेत्री मधुराणी गोखले घराघरात पोहोचली. मधुराणीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. नाटक, मालिका, चित्रपटांत काम केलेल्या मधुराणीला अरुंधतीने खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांवरही छाप पाडली. अभिनेत्री असण्याबरोबरच मधुराणी एक उत्तम कवयित्री, लेखिका, संगीतकारही आहे.

मधुरणीने नुकतीच 'इसापनीती' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत मधुराणीने करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबरोबरच स्त्री शक्तीवरही भाष्य केलं. “कधी कधी बाईपणामुळे पुरुष दबला जातो. स्त्रीपणाचा कधी कधी गैरवापर केला जातो, असं वाटतं का?” असा प्रश्न मधुराणीला मुलाखतीत विचारला गेला. यावर उत्तर देत मधुराणी म्हणाली, “पुरुष दबला गेला तर काय हरकत आहे? कायम स्त्रियांनीच दबून राहायचं का? आता पुरुषांनीही दबलं पाहिजे. त्याशिवाय त्यांना स्त्रीचं दु:ख कळणार नाही. पुरुषांनी त्यांच्यात बदल केले नाहीत, तर स्त्रिया त्यांचं ऐकणार नाहीत. हे पुरुषांनी आता मान्य करायला हवं.”

“इर्शाळवाडीशी माझा खूप जवळचा संबंध आहे”, जुई गडकरी भावुक, म्हणाली, “मी गेल्याच वर्षी...”

“आता स्त्रिया आर्थिक आणि वैचारिकरित्या स्वतंत्र होत आहेत. स्त्रियांना त्या आहेत तशा तुम्ही स्वीकारलं नाही, तुम्ही स्वत:मध्ये बदल केले नाहीत. तर लग्न मोडतील. आता तुम्हाला याकडे नवीन पद्धतीने बघावं लागेल. तरच ते टिकेल. आणि टिकले नाहीत तरी चालेल....ते मोडूदेत. कारण, त्यातूनच नाविन्य निर्माण होणार आहे. लग्न कशामुळे मोडत आहेत, याचा विचार पुढच्या पिढ्यांनी केला पाहिजे. तुम्ही स्त्रिला कमी लेखलं तर ती एकटी जगू शकते. कारण, ती स्वतंत्र आहे. आता जर तिच्याबरोबर संसार करायचा असेल, तर तिला खाली ठेवून नाही तिला बरोबरच येऊन काम करावं लागेल. हे बदल जर पुरुषांनी केले, तर चांगला समाज निर्माण होईल,” असंही पुढे मधुराणीने सांगितलं.

अमृता देशमुख-प्रसाद जवादेने गुपचूप उरकला साखरपुडा, अभिनेत्रीचा भाऊ कमेंट करत म्हणाला...

मधुराणी पुढे म्हणाली, “मला वाटतं, नवीन पिढीतील मुलं नक्कीच या गोष्टी शिकतील. कारण, स्त्री-पुरुष दोघांनाही एकमेकांची गरज आहे. आजकालची मुलं शहाणी आहेत. त्यांना या गोष्टी कळतात, असं मला वाटतं. आताची मुलांना संपूर्ण जगभरातील कंटेट उपलब्ध आहे. त्यामुळे केवळ देशातीलच नाही तर जगभरातील नाती ते पाहत आहेत. मला आशा आहे की ते नक्की बदलतील.” दरम्यान, मधुराणीच्या संसारात वादळ आल्याचं वृत्त होतं. मधुराणी तिचा पती प्रमोद गोखले यांच्यापासून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु, हे वृत्त खोटं असल्याचं मधुराणीचे पती प्रमोद यांनी सांगितलं होतं.

टॅग्स :मधुराणी प्रभुलकरमराठी अभिनेताआई कुठे काय करते मालिका