‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte ) या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सध्या ही मालिका सध्या एका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. साहजिकचं मालिकेची जोरदार चर्चा आहे. मालिकेत मुख्य भूमिका साकाणारी अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर (Madhurani gokhale Prabhulkar) हिचीही कमी चर्चा नाही. तिने साकारलेली अरूंधतीची भूमिका प्रेक्षकांच्या मनाला चांगलीच भावली आहे. ऐरवी मधुराणी मालिकेत अगदी साधी नेसून वावरतात दिसते. पण गेल्या काही दिवसांपासून तिचा नवा लुक व्हायरल होतोय. होय, मालिकेत ‘अरूंधती’ नव्या मॉडर्न लुकमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. पण यात तथ्य नाही. होय, खुद्द मधुराणीने अफवांवर विश्वास ठेऊ नका म्हणून, या नव्या लूकच्या चर्चेला पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.व्हायरल फोटोमध्ये मधुराणी जीन्स, ब्लॅक टॉप आणि ब्ल्यू जॅकेटमध्ये दिसते. हा आहे ‘अरूंधती’चा नवा लुक, असा दावा करत हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पण मधुराणी हा दावा खोटा ठरवला आहे. संबंधित व्हायरल फोटो शेअर करत तिने पोस्ट शेअर केली आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका,असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मधुराणी प्रभुलकरचा जन्म भुसावळ येथे झाला, तर तिचे शिक्षण आणि बालपण पुण्यात गेले. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी तिने अभिनय प्रवासाला सुरूवात केली. तिने स्वत: लिहिलेल्या आणि तिची निर्मिती असलेल्या ‘सी-सॉ’ या नाटकाला सर्वोत्तम नाटकाचा ‘पुरुषोत्तम करंडक’ पुरस्कार मिळाला होता. तुमचं आमचं सेम असतं आणि नवरा माझा नवसाचा या मराठी चित्रपटात देखील भूमिका साकारली आहे. ‘सा रे गा मा पा’ या सिंगिंग शोच्या सेलिब्रिटी पर्वामध्ये भाग घेऊन तिने आपल्या गायन कौशल्याची चुणूक दाखवली.