'आई कुठे काय करते' या मालिकेने तब्बल ५ वर्ष प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर घराघरात पोहोचली. या व्यक्तिरेखेने मधुराणीला एक वेगळी ओळख मिळवून दिली. मधुराणीचा चाहता वर्ग मोठा आहे. मालिका संपल्यानंतरही ती सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
मधुराणीने नुकतंच पंढरपुरच्या विठुरायाचं दर्शन घेतलं. त्यानंतर अभिनेत्रीने थेट अक्कलकोट गाठलं आहे. मधुराणीने अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. स्वामी समर्थांच्या चरणी अभिनेत्री नतमस्तक झाली. याचे फोटो आणि व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. "अशक्यही शक्य करतील स्वामी…!", असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. मधुराणीच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
मधुराणी प्रभुलकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक नाटक, मालिकांमध्ये काम केलं आहे. 'आई कुठे काय करते' मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. 'नवरा माझा नवसाचा' या सिनेमातही मधुराणी झळकली होती.