Join us

"याबाबत मौन धरलं...", 'आई कुठे..." फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, म्हणाली-"स्क्रीन प्रेझेन्स फार नसे पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:53 IST

छोट्या पड्यावर बऱ्याच नवीन मालिका प्रसारित होत असतात मात्र, त्यातील मोजक्याच मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात.

Radhika Deshpande: छोट्या पड्यावर बऱ्याच नवीन मालिका प्रसारित होत असतात मात्र, त्यातील मोजक्याच मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. शिवाय त्या मालिकांमधील पात्रं सुद्धा चाहत्यांच्या आठवणीत राहतात. या यादीत 'आई कुठे काय करते'  मालिकेचं नाव घेतलं तर काही वावगं ठरणार नाही. जवळपास ५ वर्षे या मालिकेनं प्रेक्षकाचं मनोरंजन केलं. दरम्यान, या मालिकेत अरुंधतीची मैत्रीण म्हणजे देविकाची भूमिका अभिनेत्री राधिका देशपांडेने साकारली आहे. अशातच राधिकाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. 

'आई कुठे...' फेम राधिका देशपांडेने महिला दिनानिमित्त इन्स्टाग्रामवर सुंदर कविता शेअर केली होती. ही कविता पोस्टच्या माध्यमातून तिने रि-शेअर करत चाहत्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. राधिकाने या पोस्टद्वारे 'आई कुठे'चा  प्रवास मांडला आहे. या व्हायरल पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहिलंय, "साधारण ५०० एपिसोड्स झाले असतील, देविका अंदाजे १०० एपिसोड्स मध्ये दिसली आहे. आणि राधिकेने शूट फार तर फार ५० दिवस केले आहे. मालिका सुरू झाली आणि देविका घराघरात पोहोचली. स्त्रियांच्या मनामनात घर करायला तिला फारसा वेळ लागला नाही. परवा महिला दिनानिमित्त ‘देविका‘चा संदर्भ जोडत एक कविता WhatsApp to WhatsApp प्रवास करत करत माझ्या मोबाईल मधे पोहोचली. “देविका” अशी हाक मारत एखाद्या बाईने मिठी मारणे, माझ्या जवळ रडणे, देविका माझ्या पण आयुष्यात ये ना... असे सातत्याने होत आले आहे. पण सोशल मीडियावर मी या बाबतीत मौन धरलं. स्मॉल स्क्रीन शॉर्ट मेमरी म्हणतात पण अजूनही मनातच नाही तर डोक्यात सुद्धा ती आहे. याचे मला आश्चर्य वाटले."

पुढे अभिनेत्रीने लिहिलं, "इन मीन १०-१२ संवाद मला मिळायचे. स्क्रीन प्रेझेन्स ही फार नसे. देविका राधिकाला मिळाली आणि ती बोलू लागली. तिचं असणं, बोलणं प्रत्येक महिलेला हवं आहे. आज जास्त ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे. माझ्यावर प्रेम करत राहिलात. माझी उणीव तुम्हाला भासत राहिली ही तुम्ही मला माझ्या कामाची दिलेली पावती आहे असं मी समजते. कलाकाराला आणि काय हवं! राधिका आजही आहे. कोणीच जर नसेल तर अडीनडीला मला सांगा. एका महिलेसाठी मदतीचा हात मी यानिमित्ताने पुढे करते आहे. मायबाप रसिक प्रेक्षकहो, धन्यवाद!" अशा आशयाची पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया