'त्या दिवशी मला इतकं लाजल्यासारखं झालं'; मिलिंद गवळींनी 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 06:46 PM2022-02-09T18:46:01+5:302022-02-09T18:48:21+5:30

Milind Gawali: अरुंधतीच्या यशावर, तिच्या कर्तृत्वाकडे कुस्तिकतेने पाहणारा हा अनिरुद्ध नकारात्मक भूमिका साकारुनही लोकप्रिय झाला.

aai kuthe kay karte fame aniruddha aka actor milind gawali instagram post viral | 'त्या दिवशी मला इतकं लाजल्यासारखं झालं'; मिलिंद गवळींनी 'ती' पोस्ट चर्चेत

'त्या दिवशी मला इतकं लाजल्यासारखं झालं'; मिलिंद गवळींनी 'ती' पोस्ट चर्चेत

googlenewsNext

आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी. या मालिकेत मिलिंद सध्या अनिरुद्ध ही भूमिका साकारत आहेत. अरुंधतीच्या यशावर, तिच्या कर्तृत्वाकडे कुस्तिकतेने पाहणारा हा अनिरुद्ध नकारात्मक भूमिका साकारुनही लोकप्रिय झाला. त्यामुळेच मिलिंद गवळी सध्या सोशल मीडियावर चर्चेत असतात. विशेष म्हणजे मालिकेत घडणाऱ्या वा वैयक्तिक आयुष्यात घडत असलेल्या असंख्य गोष्टींवर ते बिंधास्तपणे लिहित असतात. सोशल मीडियावर त्यांची मतं मांडत असतात. सध्या त्यांचा असाच एक किस्सा त्यांनी शेअर केला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एकदा सूट परिधान केल्यामुळे त्यांची कशी फजिती झाली होती हे सांगितलं आहे.

"पण ए सूट घालण्यामुळे माझी खूप गोची/ फजिती झाली आहे. एकदा जेजे हॉस्पिटलला एका कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून डॉक्टर लहाने यांनी मला बोलवलं होतं, मी सूट घालून गेलो, कारण डॉक्टरांचा कार्यक्रम म्हटल्यानंतर सुटचं घालावा असं मला वाटलं, पण तिकडे गेल्यानंतर पाहतो तर सगळे डॉक्टर्स धोतर ,कुर्ता, फेटा घालून कार्यक्रमाला आले होते आणि एकटाच वेड्यासारखा कोट, सूटबूट घालून गेलो होतो. त्या दिवशी मला इतकं लाजल्यासारखं झालं, काही विचारू नका. कित्येक वेळेला लग्नाला किंवा फंक्शनला हे सूट घालून जायचं आणि इतकं गरम होतं असतं, आतमध्ये घामाघूम झालेलो असतो, इतकं उकडत असत आपल्या या वातावरणामध्ये, सगळा मूर्खपणा वाटतो, मग मला वाटतं त्यांच्यापुरता घालावा छानसा कुडता घालावा, पण नाही, हौस आहेना सूट घालायची. ब्रिटिश भारत सोडून गेले, पण जाताना सॉरी, थँक्यू आणि हे सूट मागे ठेवून गेले, आपल्या संस्कृतीला हे शोभत नाही, मला हे सगळं कळतं पण वळत नाही, असं मिलिंद गवळी म्हणाले.


 

पुढे ते म्हणतात, "तीन चार वेळेला मी माझे सगळे सुट्स देऊन टाकले आणि ठरवलं आता सूट घालायचा नाही भारतीय पोशाख करायचा,पण"आई कुठे काय करते " मध्ये अनिरुद्ध देशमुख ऑफिसला सूट घालतो, मग परत सूट घालायची दोन वर्षापासून सवय लागली.पण खरं सांगू का मला सूट घालायला छान वाटतं, एक दिवशी लंडन फिरायचं आह मला सुट घालूनWhen you are in Rome behave like Romans, असं म्हणतात तसंचAnd when you are in India be like a Indian.हळूहळू मी एक माझा स्वतःचा भारतीय पोशाख तयार करणार आहे. सध्या हा इंग्रजी डोंबाऱ्याचा खेळ चालला आहे तो चालू राहू दे थोडे दिवस.लहान असतो तेव्हा आपल्याला फार अक्कल नसते,त्यावेळेला ज्या गोष्टींचं कौतुक वाटतं ,अप्रूप वाटतं ,आपल्याला हव्याश्या वाटतात आणि आपण मोठे झाल्यानंतर जे हवं होतं ते मिळाल्यावर कळतं की त्या किती शुल्लक गोष्टी होत्या, ज्याची आपण स्वप्न पाहत होतो, जोपर्यंत गोष्ट आपल्याला मिळत नाही तोपर्यंतच त्याचं कौतुक असतं, बहुतेक तसंच माझं झालं. "

दरम्यान, मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. यापूर्वीही अनेक पोस्टमधून त्यांनी त्यांचे विचार मांडले आहेत. त्यांच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो.
 

Web Title: aai kuthe kay karte fame aniruddha aka actor milind gawali instagram post viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.