स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेतील अनिरूद्ध देशमुखची ग्रे शेड भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. या मालिकेच्या आधी मिलिंद गवळीने मालिका आणि चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. मिलिंद गवळी यांची पत्नी दीपा गवळी लाइमलाइटपासून दूर राहते. मिलिंद आणि दीपाची लव्हस्टोरी खूप फिल्मी आहे.
मिलिंद गवळी मुळचा मुंबईचा आहे. एकदा एका विवाहाला उपस्थित राहण्यासाठी म्हणून ते जळगावला गेले होते. तिथे त्यांना एक मुलगी दिसली. पहिल्याच नजरेत ती तिच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी लग्न देखील केले. ही मुलगी म्हणजे त्यांची पत्नी दीपा गवळी.
त्यांच्या लग्नाला घरच्यांकडून होकार तर होता, पण मुलाला ठोस अशी नोकरी असावी, अशी अपेक्षा दीपाच्या घरच्यांकडून होती. मिलिंद यांनी हे त्यांचे म्हणणे मान्य केले. त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटीमधून एम.कॉमचे पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. पुढे त्यांनी ऑल इंडिया रेडिओसाठी रीतसर परीक्षा देऊन त्यात काम करायला सुरुवात केली. त्यामुळे अभिनयाच्या करियरमध्ये बराच गॅप पडला. मात्र मिलिंद गवळीने पुन्हा कमबॅक केले आणि मग मागे वळून पाहिले नाही.