Join us

'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीने चाहत्यांसोबत शेअर केले तिचे लॉकडाऊन रुटीन Watch Video

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 3:30 PM

या व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना ख-या आयुष्यातल्या अरुंधतीविषयी अनेक गोष्टी जाणून घेता आल्या.

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली. मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. टीआरपीमध्येही मालिकेने अव्वल स्थान मिळवले होते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली आहे.

 

अरुंधती असो, अनिरुद्ध असो, संजना असो किंवा मग मालिकेतील इतर कलाकार, सर्वांनाच ह्या मालिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली. या सर्वांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरली ती अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखले.मधुराणी गोखले या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रिय झाली आहे. तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात रसिकांची इच्छा असते. सध्या लॉकडाऊन सुरु आहे. शूटिंग बंद आहेत. त्यामुळे सध्या कलाकार घरातल्या कामांमध्ये बिझी झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

एरव्ही शूटिंगमुळे घरात लक्ष देता येत नसल्यामुळे अभावानेच घरात काम करताना दिसतात. मात्र लॉकडाऊनमुळे आता वेळच वेळ असल्याने कलाकार घरात वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसतात. यात सा-यांची लाडकी अरुंधती म्हणजे मधुराणीने देखील तिचे लॉकडाऊन रुटीन चाहत्यांसह शेअर केले आहे. घरात जेवण बनवण्यापासून ते आईसोबत गाण्याचा रियाझ करण्यापर्यत सगळ्याच गोष्टी अगदी आनंदाने मधुराणी घरात करताना दिसते. मध्येच मुलीलाही आभ्यासात मदत करताना दिसते. 

स्टार प्रवाहाच्या ऑफिशिअल पेजवरुन मधुराणीचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते लाईक्स आणि भरपूर कमेंट्स करत पसंती देत आहेत. मधुराणी रिअल लाईफमध्येही घरात काम करत असल्याचे पाहून तिचे कौतुक करत आहेत. अभिनयाप्रमाणे तिला गाण्याचीही विशेष आवड असल्याचे समजलं. या व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना ख-या आयुष्यातल्या अरुंधतीविषयी अनेक गोष्टी जाणून घेता आल्या. तसेच घरही पाहायला मिळाले. त्यामुळे घरासाठी चाहते खास कॉम्लिमेंट देताना दिसत आहेत.

शूटिंग नसताना निवांत क्षण मुधुराणी आपल्या कुटुंबासह एन्जॉय करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. इतकं यश, लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळूनही मधुराणीमधला साधेपणा आजही कायम आहे. साधी राहणीमान, कामावरील श्रद्धा आणि कुटुंबावरील जीवापाड प्रेम यामुळे मधुराणी गोखले आज रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे.