Join us

'आई कुठे काय करते'मधील अरूंधती उर्फ मधुराणीच्या नव्या फोटोने वेधले सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 07:00 IST

Aai Kuthe Kay Karte : मधुराणी गोखलेचा लेटेस्ट फोटो चर्चेत आला आहे.

अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली छोट्या पडद्यावरील मालिका आई कुठे काय करते सध्या उत्कंठावर्धक  वळणावर आली आहे. मालिकेत आशुतोष या पात्राची एन्ट्री झाल्यानंतर मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. आशुतोष हा अरूंधतीचा कॉलेजचा मित्र आहे. ज्याला कॉलेजच्या जीवनात अरूंधती आवडायची आणि त्यामुळे आजही तो सिंगल आहे. त्यामुळे आता अरूंधती आणि आशुतोष यांचे लग्न होईल का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अरूंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने साकारली आहे. दरम्यान मधुराणीचा नवीन फोटो चर्चेत आला आहे.

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोत मधुराणी गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये दिसते आहे. तिने हा फोटो शेअर करत लिहिले की, आह को चाहिए इक उम्र असर होते तक कौन जीता है तिरी ज़ुल्फ़ के सर होते तक.

मधुराणीच्या या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. मधुराणी प्रभुलकरच्या या फोटोवर एका युजरने म्हटले की, साधी पण सुंदर. तर दुसऱ्या एकाने लिहिले की, अप्रतिम. तर आणखी एका युजरने म्हटले की, खूपच सुंदर फोटो. मधुराणीच्या या फोटोला खूपच पसंती मिळताना दिसते आहे.

मधुराणीने या माध्यमात केले काममधुराणी गोखले ही मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री असून जाहिरात क्षेत्रापासून तिने करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर हळूहळू तिचा प्रवास रुपेरी पडद्याकडे झाला. आजवरच्या कारकिर्दीत तिने अनेक मालिका, नाटक, चित्रपटांमध्ये काम केले आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका