स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte)ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील आई म्हणजेच अरुंधतीच्या पात्राने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मधुराणीने नुकताच ब्लॅक साडीतला फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.
अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्रामवर ब्लॅक साडीतील फोटो शेअर करत लिहिले की, काळ्या रंगाची साडी नेहमीच सुंदर असते. या साडीत मधुराणी खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोला खूपच पसंती मिळते आहे. तसेच कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. या फोटोवर सुंदर आई, ताई साडीत खूप सुंदर दिसते, सुंदर स्माईल अशा कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
आशुतोष अरुंधतीवर प्रेम असल्याची दिली सर्वांसमोर कबुली
आई कुठे काय करते मालिकेत नुकतेच अरुंधतीने नव्या घरात गृहप्रवेश केला. त्यावेळी आप्पा, अविनाश, अनघा, यश, गौरी, ईशा आणि आशुतोष आले होते. अनघा अरुंधतीकडे आल्याचे अभिषेकला अजिबात आवडले नव्हते. तो अनघाला तिथे घेण्यासाठी आला आणि तिला, अरुंधतीला व आशुतोषला खूप काही बडबडला. त्यावर अरुंधतीने अभिषेकच्या कानशीलात लगावली आणि तिथून जायला सांगितले. आपल्यामुळे अरुंधतीच्या आयुष्यात प्रॉब्लेम आला आहे, असे आशुतोषला वाटते आणि तो देशमुखांच्या घरी जातो. तिथे तो अरुंधतीवर केलेले बिनबुडाचे आरोप सहन करणार नाही असे सांगतो. त्यावर त्याच्यात आणि अनिरुद्धमध्ये खूप वाद होतात. या वादात अनिरुद्ध आशुतोषला तुझे अरुंधतीवर प्रेम आहे ना, हे सांगना असे बोलतो आणि आशुतोष कबुलीदेखील देतो. मात्र त्याचे अरुंधतीवर प्रेम आणि पण तिचे नाही, हे स्पष्ट सांगतो. अरुंधतीदेखील हे ऐकते. त्यानंतर आता आशुतोष आणि अरुंधतीच्या नात्यावर काही फरक पडतो का, हे आगामी भागात समजेल.