Join us

'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीचा भाऊ सुधीर आहे या प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 6:20 PM

'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधतीच्या भावाची भूमिका अभिनेते केदार शिर्सेकरने साकारली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेमध्ये अरूंधती आणि अनिरूद्ध अखेर विभक्त झाले आहेत. त्यामुळे अरूंधती सध्या माहेरी राहते आहे. या मालिकेत अरुंधतीच्या भावाची भूमिका अभिनेते केदार शिर्सेकरने साकारली आहे. केदार शिर्सेकरने मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. फार कमी लोकांना माहित असेल की शशिकांत शिर्सेकरचे वडीलदेखील प्रसिद्ध अभिनेते आहेत.

केदार शिर्सेकर हा प्रसिद्ध अभिनेते शशिकांत शिर्सेकर यांचा मुलगा आहे. शशिकांत शिर्सेकर हे नाट्य, चित्रपट आणि मालिका अभिनेते म्हणून ओळखले जायचे. ‘सासरचं धोतर’,’ कमाल माझ्या बायकोची’,’नवरा बायको’,’वहिनीची माया’, ‘मुलगा माझा बाजीराव’ अशा चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी अभिनय केला होता. ऑक्टोबर २०१९ साली अभिनेते शशिकांत शिर्सेकर यांचे निधन झाले. 

केदार लहान असताना वडिलांबरोबर नाटकाच्या तालमीला जात होता. तेव्हा एका नाटकात काम करण्याची त्यांना संधी मिळाली होती. वयाच्या ८ व्या वर्षी शाकुंतल या नाटकात पहिल्यांदा काम केले.शालेय शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी नाटकात काम करण्याचे थांबवले.

पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर एकांकिका, नाट्यस्पर्धा असा प्रवास पुन्हा एकदा सुरू झाला. ‘दांडेकरांचा सल्ला’, लोच्या झाला रे’,’ यदा कदाचित’,’सही रे सही’ अशा कित्येक गाजलेल्या नाटकातून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. या नाटकाचे हजारो प्रयोग प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते.

तसेच आई कुठे काय करते, एक होती राजकन्या,प्रेम पॉइजन आणि पंगा, आम्ही सातपुते,स्वराज्यजननी जिजामाता, बाळू मामाच्या नावानं चांगभलं अशा विविध लोकप्रिय मालिकेतून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका