छोट्या पडद्यावरील विशेष लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte). या मालिकेत सध्या अरुंधतीच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षक आवडीने पाहात आहेत. मालिकेतील अरुंधतीला प्रेक्षकांनी जितकं प्रेम दिलं तितकंच प्रेम अन्य कलाकारांनाही मिळालं. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे अर्चना पाटकर (archana patkar). या मालिकेत कांचनची भूमिका साकारुन त्यांनी विशेष प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली. सध्या त्यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आपल्या खोचक पण तितक्याच प्रेमळ स्वभावामुळे कांचनने देशमुख कुटुंबीयांसह प्रेक्षकांचीही मनं जिंकली. त्यामुळे त्या अल्पावधीत लोकप्रिय झाल्या. ही भूमिका कांचन पाटकर यांनी साकारली असून त्या सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह आहेत.
कांचन बऱ्याचदा इन्स्टाग्रामवर सेटवरचे वा त्यांच्या जीवनातील काही किस्से, प्रसंग चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यावेळी त्यांनी त्यांच्या लेकासाठी एक पोस्ट लिहिली आहे. आपल्या लेकाने त्यांची बकेट लिस्टमधील एक गोष्ट कशी पूर्ण केली हे त्यांनी सांगितलं आहे.
"माझी बकेट लिस्ट - 2 आयुष्यात ज्या ज्या गोष्टीबद्दल स्वप्नं पाहतो त्या पूर्ण करायच्या आहेत. आणि त्यातली ही दुसरी गोष्ट म्हणा किंवा स्वप्नं..माझा मुलगा आदित्य आणि मला आमच्या आवडत्या जागी जैसलमेर - राजस्थान ज्याला गोल्डन सिटी म्हणतात तिथे फिरायला जायच. अचानक 4-5 दिवसाची सुट्टी मिळाली आणि आम्ही पोहचलो बकेट लिस्टमधील एक गोष्ट पूर्ण करायला.रेखीव काम केलेली छोटी आणि मोठी घर..दोन दिवस वाळवंटात टेंटमध्ये राहीलो, तिथंली गुलाबी थंडी, तिथले लोकसंगीत व नाच पाहून तर हरपून गेलो, विलक्षण अनुभव घेतला. जीप सफ़ारी, बाईक सफ़ारी, उंठ सफ़ारी,जीप कार्ट सफ़ारी त्यात बसून रणचा सूर्यास्त बघणे हे केवळ सुंदर आणि निरागस दृश्य वाटले.प्रत्येक राइड माझ्या मुलाने हट्टाने माझ्या कडून करवून घेतली … मज्जा आली. लौंगेवाला युध्द स्मारक, आपल्या BSF च्या जवानांनी दाखवलेल शौर्य, त्यावर नंतर बॉर्डर फ़िल्म आली होती हे सगळं पाहण “ भारत माता की जय “ तो अनुभव काही वेगळाच होता …अभिमानाने मन भरुन आलं…श्रीं मातेश्वरीच मंदिर (त्याची देखरेख आपले BSF चे जवान करतात ), कुलधरा ( भुतांच गाव ) सुंदर घरांच गांव - पुरातत्व विभाग त्याची देखरेख करतात आमची ही ट्रिप अतिशय छान झाली … आदित्य भारत माता की जय …, असं म्हणत अर्चना पाटकर यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान, अर्चना पाटकर यांचा मुलगा आदित्य पाटकर हा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. तो हिंदी मालिकेसाठी काम करतो. डायरेक्टर ऑफ फोटोग्राफीचा दांडगा अनुभव त्याला आहे. तर अर्चना पाटकर यांनी 'आत्मविश्वास', 'सून लाडकी सासरची', 'इना मीना डिका' यासारख्या चित्रपटात काम केलं आहे. तर आभास हा या मालिकेतही त्यांनी काम केले आहे.