मराठी कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. नुकतेच अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) हिने बॉयफ्रेंड पवनसोबत लग्नगाठ बांधली आहे. तसेच अभिनेता अभिषेक गावकर (Abhishek Gaonkar) याने गर्लफ्रेंड सोनाली गुरवसोबत लग्न केले. त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री लवकरच सात फेरे घेणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेतील आरोही म्हणजेच अभिनेत्री कौमुदी वलोकर (Kamaudi Walokar). कौमुदीने सोशल मीडियावर तिच्या केळवणाचे फोटो समोर आले आहेत.
स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते मालिका आज म्हणजेच ३० नोव्हेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेतून सर्व कलाकार घराघरात पोहचले. या मालिकेत आरोहीच्या भूमिकेतून कौमुदी वलोकरदेखील घराघरात पोहचली. आता मालिकेनं निरोप घेतल्यानंतर अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई पाहायला मिळत आहे. सध्या तिच्या केळवणाला सुरूवात झाली असून तिने इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर केले आहेत.
कौमुदी वलोकरचा मागील वर्षी डिसेंबर महिन्यात साखरपुडा पार पडला होता. आता तिच्या केळवणाचे फोटो समोर आले आहेत. मात्र ती लग्न कधी करणार आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आकाश चौकसे आहे. आकाश हा उच्च शिक्षित आहे. त्याने एज्युकेशनमध्ये पीएचडी केली आहे. तिचा होणारा नवरा UC Berkeleyसाठी संशोधक म्हणून काम करतो. शिवाय ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशनसाठी स्वयंसेवक म्हणून काम करतो. तसेच त्याची स्वतःची वेबसाइटदेखील आहे. ज्यावर त्याने अनेक ब्लॉग लिहिले आहेत.