Join us

'तुला आठवण्याचा एक बहाणा आहे'; मधुराणीची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 19:13 IST

Madhurani gokhale: मधुराणीने नुकतीच कवी चंद्रशेखर गोखले यांची कविता सादर केली आहे.

छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte). या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले हिने अरुंधती ही मुख्य भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे उत्तम अभिनयासह स्वभावातील साधेपणा यामुळे मधुराणी अल्पावधीत लोकप्रिय झाली.त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. मधुराणीदेखील या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नवीन पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. यात अलिकडेच तिने एक कविता सादर केली आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली मधुराणी उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच कवयित्रीदेखील आहे. त्यामुळे अनेकदा ती तिच्या कविता सादर करत असते. तर, काही वेळा काही दिग्गद कवींच्या कविता सादर करुन दाखवते. यात तिने नुकतीच कवी चंद्रशेखर गोखले यांच्या कवितेचं वाचन केलं आहे. 

"तुझ्यावर रागावणं, हा तुला आठवण्याचा एक बहाणा आहे. तू आलास की तो जातो. तसा माझा राग शहाणा आहे," अशी कविता चंद्रशेखर गोखले यांची असून मधुराणीने ती सुंदररित्या सादर केली आहे. 

टॅग्स :मधुराणी प्रभुलकरटेलिव्हिजनसेलिब्रिटी