Join us  

"मनावर दुःखाची छाया पसरलेली असते अन्.."; मधुराणी प्रभुलकरची नवीन पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 12:43 PM

मधुराणी प्रभुलकरने सोशल मीडियावर एक कविता पोस्ट करून खास पोस्ट लिहिली आहे. काय म्हणाली मधुराणी?

मधुराणी प्रभुलकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. मधुराणीला आपण 'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीच्या भूमिकेतून पाहत आहोत. मधुराणी सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असते. मधुराणीने नुकतीच एक पोस्ट शेअर केलीय. यावेळी मधुराणीने मनाच्या दुःखद अवस्थेवर मात करत आनंद कसा मिळवावा, यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

मधुराणीने मंगेश पाडगावकरांची एक कविता पोस्ट केली आहे. ही कविता पोस्ट करुन मधुराणी लिहिते, "मंगेश पाडगावकर ह्यांची ही एक सुंदर लघुकविता. प्रत्येकाच्या आयुष्यात एक काळ असा येतो की , काहीच मनासारखं घडत नसतं ...सगळंच चुकत असतं, मनावर एक रितेपणाची , दुःखाची छाया पसरलेली असते...! कधी काही कारणाने किवा कधी कारणाशिवाय सुद्धा असं होतं."

मधुराणी पुढे लिहिते, "मंगेश पाडगावकर म्हणतात अशावेळी सुकलेल्या झाडाला पाणी घालावं. मला या कवितेतले 'सुकलेले झाड' म्हणजे आपल्या मनाचे प्रतिक वाटतं. कुठेतरी आपलं मन सुकलेलं असतं, थकलेलं असतं ,हळवं झालेलं असतं , विखुरलेलं असतं. अशा मनाला पाणी घालावं म्हणजे काय तर त्याला विसावा मिळेल, नवजीवन मिळेल , असं काहीतरी करावं म्हणजे अर्थातच आपल्याला आनंद वाटेल, सहज आनंद मिळेल असं काहीतरी करावं. ते काय असेल हे प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं."मधुराणी शेवटी लिहिते, "मी अशावेळी माझ्या आवडीच्या कविता वहीत उतरवून काढते किंवा माझ्या आवडीची गाणी ऐकते . ध्यान करते, एखादा छान पॉडकास्ट ऐकते.तुम्ही काय करता ? ( एकच कविता प्रत्येकाला वेगळी जाणवू शकते हं. तुम्हाला या कवितेतून काही वेगळा अर्थ कळला असेल तर तोही जरूर सांगा )."

टॅग्स :मधुराणी प्रभुलकरआई कुठे काय करते मालिका