मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर (madhurani gokhale-prabhulkar). उत्तम अभिनय आणि स्वभावातील साधेपणा यामुळे तिने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेच्या माध्यमातून मधुराणीला तुफान लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने अरुंधती ही भूमिका साकारुन घराघरात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मधुराणीने अलिकडेच खास व्यक्तीसाठी पोस्ट शेअर केली आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मधुराणी प्रभुलकरला अलिकडेच संस्कृती कलादर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ‘कलादर्पण’ पुरस्कार सोहळ्यात मधुराणी प्रभुलकरला ‘आई कुठे काय करते’ मालिकेसाठी मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यातले काही फोटो शेअर करत त्यांनी ही खास पोस्ट शेअर केली आहे.
मधुराणी प्रभुलकरची पोस्ट“संस्कृती कलादर्पण’ पुरस्काराला मी नेसलेल्या ह्या साडीचे खूपच कौतुक झाले. त्यानिमित्ताने ही पोस्ट. ही सुंदर साडी मला माझ्या ‘प्रज्ञा अवसारमोल’ ह्या दिव्यांग मैत्रिणीने तिच्या पहिल्या पगारातून गिफ्ट केलीये. एकदा मुंबईत रस्ता क्रॉस करून देताना तिची माझी ओळख झाली आणि आम्ही संपर्कात राहिलो. ती आता आमच्या घरातलीच आहे. स्वरालीशी सुद्धा तिची छान गट्टी आहे. बुलढाण्याच्या हिनी अतिशय जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीत तिचं शिक्षण पूर्ण केलंय. आता ती एका बॅंकेत छान जॉब करते. अलिकडेच तिचं लग्नही झालं. छान संसार करतेय. खूप अभिमान वाटतो आम्हाला तिचा. आणि आपण किती छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करतो अशी लाजही वाटते कधी कधी. तिने मला खरंतर तसं कधीच 'बघितलेलं' नाही. पण मला ही साडी इतकी आवडेल, ती माझ्यावर इतकी खुलून दिसेल हे कसं कळलं असेल तिला...! काय म्हणायचं तिच्या ह्या 'दृष्टीला' !