Milind Gawali : रडकेच सिनेमे का करायचे? का आपण प्रेक्षकांना रडवायचं? मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 04:23 PM2023-03-14T16:23:17+5:302023-03-14T16:24:25+5:30

Milind Gawali : "का आपण रडके पिक्चर्स करायचे, का ओडियन्सला आपण रडवायचं...?", असा प्रश्न एकेकाळी मिलिंद गवळी यांना पडायचा...

aai kuthe kay karte fame marathi actor milind gawali post viral | Milind Gawali : रडकेच सिनेमे का करायचे? का आपण प्रेक्षकांना रडवायचं? मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

Milind Gawali : रडकेच सिनेमे का करायचे? का आपण प्रेक्षकांना रडवायचं? मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

googlenewsNext

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतून घराघरात पोहोचलेलं एक नाव म्हणजे अनिरूद्ध अर्थात अभिनेते मिलिंद गवळी.मिलिंद गवळी (Milind Gawali) हे सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. आपल्या आयुष्यातील अनेक आठवणी, अनेक किस्से, दैनंदिन आयुष्यातील घडामोडी ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या त्यांची अशीच एक पोस्ट व्हायरल होतेय. 
रडावसं वाटलं तर माणसाने रडावं मन मोकळं करावं, असा सल्ला मिलिंद गवळी यांनी या पोस्टमधून दिला आहे. "का आपण रडके पिक्चर्स करायचे, का ओडियन्सला आपण रडवायचं", असा प्रश्न एकेकाळी मिलिंद गवळी यांना पडायचा. एका बड्या निर्मात्यानं त्यांना या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. त्याचाही उल्लेख पोस्टमध्ये आहे.

वाचा, मिलिंद गवळी यांची पोस्ट
रडावसं वाटलं तर माणसाने रडावं मन मोकळं करावं...
असंख्य गोष्टी मनाविरुद्ध घडत असतात ,मनाला दुखावणाऱ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला सतत घडत असतात ,आपल्या मनाला त्याचा त्रास होत असतो आणि ते सतत चालू असतं. आणि खूप आतल्या आत आपण साठवून ठेवत असतो, मग अचानक बांध फुटतो आणि आपण उपसाभक्षी ढसाढसा रडायला लागतो आणि मग रडून झालं की मन शांत होत , आपल्याला बरं वाटतं. पूर्वीच्या काळी कुणी गेलं आणि जर त्याचा जवळचा व्यक्ती रडत नसेल तर त्याला जबरदस्ती रडायला लावायचे, कित्येक वेळा माझ्या कानावर ते शब्द पडलेले आहेत , “मोकळी हो बाई मोकळी हो रड.”
एकदा producer कैं. अण्णासाहेब देशपांडे यांना मी म्हणालो होतो "का आपण रडके पिक्चर्स करायचे, का ओडियन्सला आपण रडवायचं, "
त्यांनी मला सांगितलं होतं की, गावा खेड्यातल्या बायका आयुष्यामध्ये खूप सोसतात खूप सहन करतात, सिनेमाच्या माध्यमातून त्या मोकळ्या होतात, त्यांचं मन शांत होतं, आमच्या प्रोडूसर कैं. वासवानीने "सुन लाडकी सासरची " चित्रपटांमध्ये बायकांना हात रुमाल वाटले होते,
त्यांना इतकी खात्री होती की सिनेमा बघताना बायका भरभरून रडणार.

सिनेमात काम करताना आम्हाला बरेच वेळेला रडायचे प्रसंग येतात, आम्हचं काम करत असताना मन मोकळं होतं,
सामान्य माणसाचं काय होत असेल, काहींना तर रडायची अजिबात सवयच नसते, च्या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळं मनामध्ये साठवून राहत असेल का? टॉक्सिक Toxic होत असेल का? Stressful होत असेल का?
म्हणून लोक आजारी पडत असतील का? महत्त्वाचं म्हणजे जो माणूस रडतो, ज्याच्या डोळ्यातून अश्रू येतात, तो संवेदनशील तर असतोच पण तोच खरं आयुष्य जगतो असं मला वाटतं....
 

Web Title: aai kuthe kay karte fame marathi actor milind gawali post viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.