स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते मालिकेत उत्कंटावर्धक वळणावर येऊन पोहचली आहे. मालिकेत अभिषेक आणि अनघाचा साखरपुडा पार पडणार होता. पण अंकिताने सुसाईडचा प्रयत्न केल्याचे समोर येताच अभिषेक साखरपुडा सोडून अंकिताकडे मुंबईला जायला निघतो. दरम्यान नवीन प्रोमोत अभिषेक गावी परततो तेव्हा तो अंकिताशी लग्न करून तिला घेऊन येतो, असे पहायला मिळत आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज झाले आहेत आणि ते सोशल मीडियावर अभिषेकची भूमिका साकारणारा अभिनेता निरंजन कुलकर्णीला ट्रोल करत आहेत. त्यावर आता या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.
मिलिंद गवळीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर निरंजनसोबतचे फोटो शेअर करत पोस्ट शेअर केली. त्यात त्याने म्हटले की, निरंजन कुलकर्णी म्हणजेच "आई कुठे काय करते" चा डॉक्टर अभिषेक देशमुख ,सध्या अंकिताशी लग्न करून आल्यामुळे असंख्य लोक अभिषेक देशमुखला अक्षरशः शिव्या घालत आहेत, काल रात्री त्यांनी मला इंस्टा पोस्टवर लोकांनी ज्या शिव्या दिल्या त्या वाचून दाखवल्या, काय गंमत आहे बघा, मागच्या महिन्यात त्यांनी मला काही व्हिडिओ दाखवले होते त्यात अभिषेक देशमुखला हॉस्पिटलमध्ये पेशंटचे नातेवाईक मारतात ते बघून लहान मुलं "अभीला का मारतात" नका मारू त्याला, दुसरी पोस्ट होती "अभी ला हात लावला हातात तुला सोडत नाही" खूप प्रेमाचे मायचे कमेंट्स त्यांनी मला दाखवले होते.
अनिरुद्ध देशमुख म्हणून मला शिव्या बसल्या त्याचं मला काही वाटत नाही, मी हसत हसत मीम्स पण स्वतः शेअर करतो.पण मिलिंद गवळी म्हणून निरंजन कुलकर्णीला द्वेष करणारे पाठवतात त्या वेळेला राग येतो ,वाईट वाटते, त्रास होतो, एका उत्तम कलाकाराच्या पालकाच्या, आई वडीलच्या वेदना खूप कमी लोक समजू शकतात, त्याला कोणी वाईट बोललेले सहन होत नाही, असे मिलिंद गवळीने पोस्टमध्ये म्हटले आहे.