Join us

"मला हे सगळं सहन करावं लागतं..." ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धची ती पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 12:44 PM

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ मालिकेत संजना तिची प्रेग्नेंसी टेस्ट करणार आहे. त्यावरुन अनिरुद्धला आणि मालिकेला ट्रोल करण्यात येतंय. यावर आता अभिनेत्याने पोस्ट लिहिली आहे.

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte ) ही प्रेक्षकांची आवडती मालिका. अरूंधती, अनिरूद्ध, संजना यांच्याभोवती फिरणाऱ्या या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. मालिकेत आत्तापर्यंत अनेक अनपेक्षित वळणं आलीत आणि या वळणांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. पण आता हीच मालिका ट्रोल होतेय. होय, कारण आहे अनिरूद्ध.

सोशल मीडियावरील रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये संजना तिची प्रेग्नेंट टेस्ट करणार आहे. यावरून अनिरुद्धची आई कांचन त्याला आजोबा होण्याच्या वयात तू बाबा होणार आहेस का असा प्रश्न विचारते. यावरुन अनिरुद्धला सोशल मीडियावर देखील ट्रोल करण्यात येतं आहे. यावर आता अभिनेत्या एक पोस्ट शेअर केली आहे जी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.   मिलिंद गवळीची पोस्ट “अनिरुद्ध वेडा झालाय' ;  (लेटेस्ट एपिसोड पाहून प्रेक्षकांना कमेंट आवरेना आधी संजना आता अनिरूद्ध होतोय TROLL . आई कुठे काय करते मालिकेचा एपिसोड पाहून प्रेक्षकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.) NEWS पेपर मध्ये ही बातमी मी वाचली. खूप दिवसापासून Trolling Trolling हा शब्द ऐकत होतो, मग गुगल वर जाऊन Trolling चा अर्थ शोधायचा प्रयत्न केला What does trolling mean in social media? An online troll uses the internet to deliberately provoke or get a rise out of others. Their actions can be a small-scale irritant or cause a major problem. The term “troll” usually refers to someone who maliciously harasses, attacks, or cyberbullies others.

 पण अनिरुद्ध च्या बाबतीत हे ट्रोलिंग नाहीच आहे, खरंच अनिरुद्ध वेडा झालाय, खरच तो वेड्यासारखा वागतोय, आणि मला स्वतःला त्याचं खूप वाईट वाटतं, मीच अनिरुद्ध असल्यामुळे मला हे सगळं सहन करावं लागतं, पण अनिरुद्ध च्या जागी दुसरा कोणी जरी असतात तरी तो वेड्यासारखाच वागला असता, वर्षानुवर्ष करता पुरुष म्हणून एका मल्टी नॅशनल कंपनीमध्ये मोठ्याहुद्द्यावर काम करणारा माणूस, अचानक बेकार होतो, दीड वर्ष घरी बसतोय, त्याच्या मुळेच चांगला सुखी संसार मोडतो , विक्षिप्त वागायला लागतो, आयुष्यात आलेल्या दोन्ही बायकांना , त्याच्या आई-वडिलांना त्याच्या मुलांना, चिडक्या हट्टी इगोस्टिक स्वभावामुळे त्रास देतो, आता सगळे त्याचा तिरस्कार करायला लागलेले आहेत, हा माणूस वेडा नाही होणार तर काय होणार,पण मला स्वतःला म्हणजे मिलिंद गवळीला अनिरुद्ध खूप आवडतो, कारण हा अनिरुद्ध, अरुंधतीशी, संजना, यश ,आशुतोष अविनाश, आनीश सगळ्यांशी कसा जरी वागला असेल तरी, मला स्वतःला त्यांनी खूप खूप प्रेम दिलं, त्यांच्या मुळेच मला लोकांची प्रेक्षकांचं खूप खूप प्रेम मिळत आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकामिलिंद गवळीसेलिब्रिटी