Join us

'आई कुठे काय करते' शिवाय दुसरं काम घेणार नाही; ऑडिशनची वाटते भीती ? मिलिंद गवळी यांची पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 4:58 PM

आई कुठे काय करते ही मालिका त्यांच्यासाठी किती खास आहे आणि मालिकेसोबत कोणतीच तडजोड करणे शक्य नाही अशा प्रकारची त्यांची ही पोस्ट आहे.

'आई कुठे काय करते' (Aai kuthe kay kartey) या लोकप्रिय मालिकेतील अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे जी आता व्हायरल होत आहे. आई कुठे काय करते ही मालिका त्यांच्यासाठी किती खास आहे आणि मालिकेसोबत कोणतीच तडजोड करणे शक्य नाही अशा प्रकारची त्यांची ही पोस्ट आहे.

मिलिंद गवळी यांनी त्यांचा एक व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं, ' आताच एका दिग्दर्शकाचा एका वेब सिरीजमधील भुमिकेसाठी फोन आला. हा नववा फोन होता. तेही प्रमुख भुमिकेसाठी त्यांनी फोन केला होता. सिरीजबाबत त्यांनी खूप सुंदररित्या समजावून सांगितले. कोणताही अभिनेता लगेच ऑफर स्वीकारेल अशी ती सिरीज आहे. मुख्य भुमिका कोणाला नको असते. पण मी या भुमिकेसाठी ऑडिशन दिले नाही. कारण मी आई कुठे काय करते मालिकेशिवाय कोणताच प्रोजेक्ट स्वीकारणार नाही. 

ते पुढे लिहितात, ' जेव्हा माझ्या करिअरची सुरुवात झाली, तेव्हा प्रोडक्शन हाऊसला तुमचे प्रोफाईल, तुमचे फोटो पाठवण्याची पद्धत असते आणि पुढे प्रक्रिया होत असते. मग प्रोडक्शन हाऊस फोन करुन दिग्दर्शकासोबत भेट घडवून आणतात. तुम्हाला घ्यायचं की नाही हे दिग्दर्शक ठरवतो. आता काळ बदलला आहे, ही प्रक्रियाही बदलली आहे. आता तुम्हाला प्रत्येक भुमिकेसाठी ऑडिशन द्यावी लागते. मग क्रिएटिव्ह टीम हे ऑडिशन बघते आणि तुम्हाला कास्ट करते.माझ्यासाठी ऑडिशन हा नेहमीच एक अडथळा असेल. मी अनेक आवडते प्रोजेक्ट केवळ ऑडिशनमुळे नाकारले आहेत. मी कधीच ऑडिशन दिली नाही असा त्याचा अर्थ होत नाही पण मी त्यात चांगलाही नाही. मात्र सध्याची पिढी प्रचंड हुशार आहे. त्यांची सहजता पाहून आश्चर्य वाटतं. मी ९९ % काम हे ऑडिशन न देता केले आहे. मी जुन्या काळातील अभिनेता आहे हे माझं नशीब नाहीतर मी इथे टिकू शकलो नसतो. मोबाईलवर एखादा सीन शूट करुन पाठवणं हे कितीही सोप्पं असलं तरी मला फार विचित्र वाटतं. असं असूनही मी नमिताला अनिरुद्धच्या पात्रासाठी व्हिडिओ पाठवला आणि नंतर काय झालं हे तुम्ही बघतच आहात.'

मिलिंद गवळी यांनी सध्याच्या कास्टिंग प्रक्रियेवर बोट ठेवले आहे. नुकतेच अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही या ऑडिशन द्यायला भीती वाटत असल्याचं सांगितलं होतं. जुन्या अॅक्टर्सना ऑडिशनची असलेली भीती वेळोवेळी समोर येत आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकामिलिंद गवळीमराठी अभिनेतामराठीस्टार प्रवाह