Join us

'आई कुठे काय करते' मालिकेतील संजनाचा कोरोना रिपोर्ट आला पॉझिटीव्ह, म्हणाली-सर्व काळजी घेऊन ही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 20:07 IST

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte)मालिकेच्या सेटवर प्रत्येकची चाचणी करण्यात आल्याचं समजतंय.

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना विषाणूसोबत लढा देत आहे. आतापर्यंत सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना या विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. व्हॅक्सीनचे दोन डोस घेऊन योग्य ती काळजी घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte)मालिकेतील अभिनेत्रीचा ही कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनेच ही माहिती दिलीय.

आई कुठे काय करते मालिकेत संजनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रुपाली भोसलेला कोरोनाने गाठलं आहे. रुपाली इन्स्टा स्टोरीवरुन ही माहिती दिली. रुपालीने स्वत:ला आयसोलेशनमध्ये आहे. ती घरात क्वारांटाईन झाली आहे. ''सर्व काळजी घेऊन ही माझी टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. मी लवकरच यातून बरी होईन, प्लीज सगळ्यांना काळजी घ्या, मास्क लावा आणि शक्य असले तर घरीच राहा.'' अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना काळजी घ्यायला सांगितली आहे.

 रुपाली भोसले एका नवीन प्रोजेक्टवर काम करत आहे. ती एका मराठी गाण्यात काम करते आहे, म्हणून तिने काही दिवस 'आई कुठे काय करते' मालिकेतून काही दिवसांसाठी ब्रेक घेतला आहे, मात्र तरीही मालिकेच्या सेटवर प्रत्येकची चाचणी करण्यात आल्याचं समजतंय. रुपालीला आई कुठे काय करते या मालिकेमुळे प्रसिद्ध मिळाली. संजना म्हणून ती घराघरात पोहोचली. 

टॅग्स :रुपाली भोसलेआई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकार