Rupali Bhosale : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) फेम अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale) नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. आजच तिने केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. Made for each other असे तिने पोस्ट मध्ये म्हणले आहे. हे वाचून वाटलं असेल रुपालीच्या आयुष्यात कोणाची एंट्री तर झाली नाही ना? तर थांबा. ही पोस्ट तिने मुंबई ट्रॅफिकवर लिहिली आहे. (Mumbai Traffic)
मुंबईच्या ट्रॅफिकमुळे सर्वच वैतागलेले असतात. सेलिब्रेटीही त्याला अपवाद नाहीत. तिने लिहिले, ट्रॅफिक आणि मी एकमेकांसाठीच बनलो आहोत. मला शुटिंगच्या सेटवर पोहोचायला फक्त ७ मिनिटे लागतात. म्हणून मी ठाण्याला शिफ्ट झाले. यामुळे मला स्वत:ला वेळ देता येईल असे वाटले. पण ट्रॅफिकचे माझ्यावर खुपच प्रेम आहे. मला एकटीला सोडतच नाही. ७ मिनिटाच्या अंतरावर जायला आज १ तास लागला. Time is money असे तिने कॅप्शन दिले आहे.
रुपालीने ही पोस्ट करुन व्हिडिओला 'मान मेरी जान' हे ट्रेंडिंग गाणेही लावले आहे. तसंच चाहत्यांनाही मुंबई ट्रॅफिकबद्दल आपल्या भावना मांडायला सांगितल्या आहेत.